(Source: ECI | ABP NEWS)
एवढ्या मिरच्या का लागल्या, प्रचंड चिडचिड होते का? प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? सुषमा अंधारेंचा कुणाल कामराची काॅपी करत शिंदे गटावर प्रहार
सुषमा अंधारे यांनी कुणाल कामरा सपोर्ट करताना त्यानं ज्या टोनमध्ये शिंदे यांचं नाव न घेता विडंबनात्मक टिप्पणी केली त्याच पद्धतीने टिप्पणी करत शिंदे गटावर प्रहार केला आहे.

Sushma Andhare attack on Eknath Shinde faction : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री यांच्या विडंबनात्मक टिप्पणी केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 40 शिवसैनिंकावरही गुन्हा दाखल केला आहे. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता 'गद्दार' म्हटले होते. 'इंडियाज गॉट लेटेंट' हा वादग्रस्त शो हॅबिटॅट स्टुडिओमध्येच चित्रित करण्यात आला होता. भाजप-शिवसेनेने कामरावर कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी तोडफोड चुकीची ठरवली आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला.
प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही?
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामरा सपोर्ट करताना त्यानं ज्या टोनमध्ये शिंदे यांचं नाव न घेता विडंबनात्मक टिप्पणी केली त्याच पद्धतीने टिप्पणी करत शिंदे गटावर प्रहार केला आहे. चिडचिड होते का? एवढ्या मिरच्या का लागल्या अशी विचारणा केली आहे. प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? अशीही विचारणा सुषमा अंधारे यांनी केली.
चला भक्तांनो,
— SushmaTai Andhare (@andharesushama) March 24, 2025
कामराचा स्टुडिओ फोडला..!
आता आपटे, सोलापूरकर , कोरटकर यांच्याकडे कधी तोडफोड करायची..? @kunalkamra88 @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm #चलागाण्याचाट्रेंडकरूया pic.twitter.com/vTv6ctNsyd
आता एवढ्या खोट्या गोष्टी सहन केल्या आणि..
त्या म्हणाल्या की, जेव्हा भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवराय, बाबासाहेबांबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केलं तेव्हा चिडचिड कुठं गेली होती? आपटेमुळं शिवरायांचा पुतळा पडला, तेव्हा त्याचं कार्यालय का फोडलं नाही. राहुल सोलापूरकरने शिवरायांनी लाच घेतली, असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरचं कार्यालय किंवा भांडारकर ट्रस्टमध्ये होता तेव्हा का फोडायला गेला नाही? प्रशांत कोरटकरने चक्क बाॅयोलाॅजिकल बापापर्यंत पोहोचायची भाषा केली तेव्हा प्रशांत कोरटकरला फोडायला हात का शिवशिवला नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. आता एवढ्या खोट्या गोष्टी सहन केल्या आणि जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने एखादी गोष्ट मांडत असेल, तर एवढ्या मिरच्या का लागल्या?
'तुम्ही मुंबईत असाल तेव्हा तुम्हाला शिवसेना स्टाईलचा चांगला धडा मिळेल'
दरम्यान, तोडफोडीप्रकरणी त्याच्यावर दाखल झालेल्या एफआयआरवर शिवसेना युवासेनेचे (शिंदे गट) सरचिटणीस राहुल कनाल म्हणाले, 'हा कायदा हातात घेण्याचा विषय नाही. ही पूर्णपणे स्वाभिमानाची बाब आहे. देशातील ज्येष्ठांचा किंवा आदरणीय नागरिकांचा विचार केला की, तुमच्या ज्येष्ठांना लक्ष्य केले जाते, तेव्हा तुम्ही त्या मानसिकतेच्या व्यक्तीला लक्ष्य कराल. संदेश स्पष्ट आहे, हा फक्त एक ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे. तुम्ही मुंबईत असाल तेव्हा शिवसेना स्टाईलने तुम्हाला चांगलाच धडा मिळेल.
























