दिनेश कार्तिक की ऋषभ पंत? यावर्षी कोणाच्या बॅटमधून निघाल्या सर्वाधिक धावा? पाहा दोघांची आकडेवारी
Rishabh Pant & Dinesh Karthik: यावर्षी ऑस्ट्रेलिया खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.
Rishabh Pant & Dinesh Karthik: यावर्षी ऑस्ट्रेलिया खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषकाचं यजमानपदं मिळालं आहे. भारतासह अनेक देशानं टी-20 विश्वचषकासाठी तयारी सुरू केलीय. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचं फॉर्ममध्ये येणं खूप गरजचं आहे. तर, भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. यावर्षी कोणाच्या बॅटमधून सर्वाधिक धावा निघाल्या आहेत.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा दिनेश कार्तिक टी-20 विश्वचषकात फिनिशरची भूमिका पार पाडेल का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच आगामी टी-20 विश्वचषकात ऋषभ पंत कशी कामगिरी करतो? याकडंही सर्वांचं लक्ष लागलंय.
ऋषभ पंत
2022 मध्ये ऋषभ पंतने 13 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 260 धावा केल्या आहेत. यादरम्यान ऋषभ पंतची सरासरी 26.00 होती. तर, स्ट्राइक रेट 135.42 होता. त्याचवेळी, या 13 टी-20 सामन्यांमध्ये ऋषभ पंतनं एकदाच 50 चा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय ऋषभ पंतची नाबाद 52 धावांची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिकनं यावर्षी 13 टी-20 सामने खेळले आहेत. या 13 टी-20 सामन्यांमध्ये त्यानं 192 धावा केल्या आहेत. यादरम्यान दिनेश कार्तिकची सरासरी 21.33 होती, तर स्ट्राइक रेट 133.33 होता. दिनेश कार्तिक एक अर्धशतकही ठोकलंय. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 55 इतकी आहे. मात्र, त्यानं अनेक सामन्यात फिनिशरची भूमिका चांगल्या पद्धतीनं पार पाडलीय.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-
- Babar Azam: 'मी म्हतारा झालोय का?' बाबर आझम पत्रकारावर भडकला, कारण काय? घ्या जाणून
- IND vs ZIM: ज्याच्यावर धोनीचा विश्वास, त्याचं खेळाडूचं भारतीय संघात पुनरागमन; झिम्बॉवेविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता
- India Tour of Zimbabwe, 2022: भारताने झिम्बाब्वे दौऱ्याआधीच कर्णधार बदलला, शिखरऐवजी केएल राहुलकडे नेतृत्व