ZIM vs IND: केएल राहुलबाबत बीसीसीआयनं घेतलेल्या निर्णयावर क्रिकेटप्रेमी नाराज
India tour of Zimbabwe: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) गुरुवारी ट्विटर पोस्टद्वारे एक आश्चर्यकारक घोषणा केली.
India tour of Zimbabwe: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) गुरुवारी ट्विटर पोस्टद्वारे एक आश्चर्यकारक घोषणा केली. भारताचा स्टार सलामीवीर केएल राहुलनं (KL Rahul) फिटनेस चाचणी उत्तीर्ण केलीय. त्यानंतर बीसीसीआय आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड केलीय. तर, शिखर धवनकडं (Shikhar Dhawan) उप-कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करणार होता. मात्र, आता राहुलकडं कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. ज्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पूर आलाय.
बीसीसीआयच्या निर्णयावर चाहते नाराज
शिखर धवन हा भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू आहे. त्यानं अनेकदा भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. परंतु, केएल राहुल भारतीय संघाचा नियमित उप- कर्णधार आहे. केएल राहुलचं पुनरागमन होताच शिखर धवनकडून नेतृत्व हिसकावून घेणे, चाहत्यांना आवडलं नाही. केएल राहुलचं संघात परतणं चांगली गोष्ट आहे. परंतु, शिखर धवनला कर्णधारपदावरून हटवणं अयोग्य असल्याचं एका नेटकऱ्यानं म्हटलंय.
दिर्घकाळानंतर केएल राहुलची संघात पुनरागमन
आयपीएलच्या पंधराव्या हंगामानंतर केएल राहुल दुखापतींशी झुंज देतोय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत केएल राहुलकडं भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली होती. परंतु, दुखापतीमुळं या मालिकेतून बाहेर पडावं लागलं. इंग्लंड दौऱ्यातही तो भारतीय संघाच भाग नव्हता. वेस्ट इंडीजविरुद्ध दौऱ्यापूर्वी तो दुखापतीतून सावरला. पण कोरोनाची संसर्ग झाल्यानं त्याला वेस्ट इंडीज दौऱ्यातून बाहेर व्हावं लागलं. परंतु, त्यानं आता दुखपतीवर मात केलीय.
भारताचं झिम्बाब्वे दौऱ्यातील वेळापत्रक-
सामना | कधी | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 18 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
दुसरा एकदिवसीय सामना | 20 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
हे देखील वाचा-
- Babar Azam: 'मी म्हतारा झालोय का?' बाबर आझम पत्रकारावर भडकला, कारण काय? घ्या जाणून
- IND vs ZIM: ज्याच्यावर धोनीचा विश्वास, त्याचं खेळाडूचं भारतीय संघात पुनरागमन; झिम्बॉवेविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता
- India Tour of Zimbabwe, 2022: भारताने झिम्बाब्वे दौऱ्याआधीच कर्णधार बदलला, शिखरऐवजी केएल राहुलकडे नेतृत्व