Shardul Thakur Hat-Trick : W,W,W,W... 'लॉर्ड' शार्दुल ठाकूरचा धमाका, आधी शतक, आता घेतली विकेटची हॅटट्रिक, BCCI निवडकर्त्यांना दिलं चोख उत्तर
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूर सध्या चर्चेत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shardul Thakur Hat-Trick : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूर सध्या चर्चेत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईकडून खेळताना त्याने रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात फलंदाजीने धुमाकूळ घातला. शार्दुलने जम्मू आणि काश्मीरविरुद्ध पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकले होते. आता त्याने चेंडूने कहर केला आहे. खरं तर, 30 जानेवारी रोजी सुरू झालेल्या मेघालय विरुद्धच्या सामन्यात त्याने हॅटट्रिक घेतली.
हॅटट्रिक घेणारा मुंबईचा पाचवा गोलंदाज!
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून हॅटट्रिक घेणारा शार्दुल ठाकूर हा फक्त पाचवा गोलंदाज आहे. त्याच्या आधी मुंबईच्या 4 गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे, ज्याची सुरुवात जहांगीर खोतने केली होती. 1443-44 च्या हंगामात त्याने बडोद्याविरुद्ध ही कामगिरी केली. त्यांच्यानंतर उमेश नारायण कुलकर्णीने 1964-64 च्या हंगामात गुजरातविरुद्ध हॅटट्रिक घेतली आणि अब्दुल इस्माइलने 1973-74 च्या हंगामात सौराष्ट्रविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे. त्यानंतर रॉयस्टन डायसने 2023-24 हंगामात बिहारविरुद्ध हा पराक्रम केला. आता शार्दुल ठाकूरने मेघालयविरुद्ध त्याची पुनरावृत्ती केली आहे.
🚨 HAT-TRICK FOR SHARDUL THAKUR IN RANJI TROPHY 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) January 30, 2025
- Thakur making a strong case for England tour in June. pic.twitter.com/Q2dcki5ayF
शार्दुलमुळे मेघालय अडचणीत
मुंबई आणि मेघालय यांच्यातील हा सामना शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये खेळला जात आहे. गुरुवार, 30 जानेवारीला मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने शार्दुल ठाकूर आणि मोहित अवस्थी यांच्याकडे गोलंदाजीची जबाबदारी सोपवली. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर निशांत चक्रवर्तीला बाद करून शार्दुलने मेघालयला पहिला धक्का दिला. दुसऱ्या षटकात मोहितने एक विकेट घेतली.
Shardul Thakur takes a hat-trick in his second over as Mumbai reduce Meghalaya to 2/6 😯😯 https://t.co/7mtNa082uM#RanjiTrophy pic.twitter.com/oBy4vHk7SM
— Cricbuzz (@cricbuzz) January 30, 2025
तिसऱ्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूंवर शार्दुलने 1 धाव दिली. आता धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात 2 धावा होत्या. त्यानंतर त्याने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग तीन विकेट घेत हॅटट्रिक पूर्ण केली आणि मेघालय संघाचा अर्धा भाग पॅव्हेलियनमध्ये पाठवला.
आतापर्यंत सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, मेघालय संघाने 20 षटकांत 55 धावांत 8 विकेट गमावल्या होत्या. यादरम्यान, शार्दुलने 9 षटकांत 27 धावा देत 4 बळी घेतले, तर मोहित अवस्थीने 6 षटकांत 15 धावा देत 3 बळी घेतले आणि सिल्वेस्टर डिसूझाने 5 षटकांत 12 धावा देत 1 विकेट घेतला आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
