एक्स्प्लोर

Rishabh Pant: मोठी बातमी: ऋषभ पंतचा जीव वाचवणारा तरुण विष प्यायला, प्रेयसीचा मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज!

Rishabh Pant: ऋषभ पंतचा उत्तराखंडमध्ये जेव्हा अपघात झाला, तेव्हा रजत देवदूत म्हणून धावून आला होता.

Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबर 2022 रोजी अपघात झाला होता. त्यावेळी रजत नावाच्या तरुणाने ऋषभ पंतचा जीव वाचवला होता. पण आता त्याच रजतने त्याच्या मैत्रिणीसोबत विष प्राशन केले. विषामुळे प्रेयसीचा मृत्यू झाला. तर रजतवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 

रजत हा मुझफ्फरनगरमधील शकरपूर येथील मजरा  येथील रहिवासी आहे. मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, दोन दिवसांपूर्वी रजतने त्यांच्या मुलीला आमिष दाखवून सोबत नेले. त्यानंतर त्याने त्याला विषारी पदार्थ खायला दिले. मुलीची आईने रजत आणि इतरांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण सध्या रजतची प्रकृती गंभीर असून प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे. 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतचा जीव वाचवणारा रजत गेल्या पाच वर्षांपासून मनू नावाच्या 21 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंधात होता. मात्र दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांना हे नाते मान्य नव्हते. दोघांच्याही कुटुंबियांनी लग्नाला नकार दिला होता. दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचे लग्न दुसऱ्या ठिकाणी अधिकृतपणे ठरवले होते. यामुळे दुःखी होऊन, रजत आणि त्याच्या प्रियसीने 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी शेतात विष प्राशन केले. दोघेही शेतात बेशुद्ध पडले असल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना उत्तराखंडमधील झाब्रेडा येथील नर्सिंग होममध्ये दाखल केले. मंगळवारी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. तर रजतवर अजूनही उपचार सुरू आहेत.

ऋषभ पंतने दुचाकी दिली होती भेट-

30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी उत्तराखंडमधील रुरकी येथे त्याच्या गावी जात असताना पंतची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. कार पलटी झाल्यावर तिला लगेच आग लागली. हा अपघात खुपच भीषण होता, पण नंतर दोन देवदूत तेथे आले, ज्यांनी पंतचे प्राण वाचवले. खरं तर, अपघातानंतर ऋषभ पंत कसा तरी रक्तबंबाळ अवस्थेत कारमधून बाहेर पडला, त्यानंतर काही मिनिटांतच कार पेटू लागली. अपघातग्रस्त कारजवळून अनेक वाहने गेली. काही लोकांनी व्हिडीओ बनवला आणि तेथून निघून गेले, पण दोन लोक तिथून जात होते आणि त्यांनी पंतला गाडीतून बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये नेले, ज्यांची नावे रजत आणि निशू होती. ऋषभ पंतला वाचवल्यामुळे दोन तरुणांना त्यांने आता एक खास भेट दिली आहे. ऋषभ पंतकडून भेट म्हणून दुचाकी मिळाल्यानंतर रजत प्रसिद्धीच्या झोतात आला. परंतु आता रजत इतके धोकादायक पाऊल उचलेल याची कोणालाही कल्पना नव्हती. आज रजत जीवन आणि मृत्यूची लढाई लढत असल्याचं दिसत आहे.

संबंधित बातमी:

मोठा धक्का! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर; जैस्वाललाही वगळले, BCCI ची घोषणा, पाहा टीम इंडियाचा संपूर्ण संघ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
Multibagger Penny Stocks : 23 वर्षात 1109 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, रेखा झुनझुनवालांकडे बँकेचे साडेतीन कोटी शेअर्स 
23 वर्षात 1109 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, रेखा झुनझुनवालांकडे बँकेचे साडेतीन कोटी शेअर्स 
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम अन् बाळासाहेब कोल्हेंना पाहून वाल्मिक कराडचा मोठा निर्णय, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वकील बदलला, नवा वकील कोण?
उज्ज्वल निकम अन् बाळासाहेब कोल्हेंना पाहून वाल्मिक कराडचा मोठा निर्णय, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वकील बदलला, नवा वकील कोण?
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Tribute Yashwantrao Chavan : अजित पवारांची प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीAjit Pawar PC Pritisangam : सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवणी चव्हाण साहेबांनी दिलीTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : 12 March 2025 : Maharashtra News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
Multibagger Penny Stocks : 23 वर्षात 1109 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, रेखा झुनझुनवालांकडे बँकेचे साडेतीन कोटी शेअर्स 
23 वर्षात 1109 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, रेखा झुनझुनवालांकडे बँकेचे साडेतीन कोटी शेअर्स 
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम अन् बाळासाहेब कोल्हेंना पाहून वाल्मिक कराडचा मोठा निर्णय, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वकील बदलला, नवा वकील कोण?
उज्ज्वल निकम अन् बाळासाहेब कोल्हेंना पाहून वाल्मिक कराडचा मोठा निर्णय, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वकील बदलला, नवा वकील कोण?
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
Donald Trump on India : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
Kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
'नो स्मोकिंग डे' का साजरा करतात?
'नो स्मोकिंग डे' का साजरा करतात?
Embed widget