Multibagger Penny Stocks : 23 वर्षात 1109 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, रेखा झुनझुनवालांकडे बँकेचे साडेतीन कोटी शेअर्स
Multibagger Penny Stocks : दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं लक्ष असतं.

मुंबई : गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओत असलेल्या फेडरल बँकेचे शेअर वेल्थ क्रिएटर्स ठरले आहेत. 23 वर्षात फेडरल बँकेच्या स्टॉकनं गुंतवणूदारांना कोट्यधीश केलं आहे. 23 वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदारानं एक लाख रुपयांचे शेअर घेतले असतील तर त्याचे सध्या एक कोटी रुपये झाले असते. याशिवाय या शेअरनं शॉर्ट टर्म देखील दमदार रिटर्न दिले आहेत.
सध्या भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण सुरु आहे. बाजारात विक्रीचा ट्रेंड सुरु आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर गडगडले आहेत.याचवेळी फेडरल बँकेचा शेअर उच्चांकावरून केवळ 17 टक्के पडला आहे.
बीएसईवर फेडरल बँकेचा शेअर 179 रुपयांदरम्यान ट्रेड होत आहे. ब्रोकरेज फर्म जियोजीत बीएनपी पारिबासच्या मतानुसार जे लोक सध्या फेडरल बँकेचे शेअर खरेदी करतील त्यांना चांगला परतावा मिळेल. रेखा झुनझुनवालांकडे फेडरल बँकेचे 3,45,30,060 शेअर आहेत. म्हणजेच कंपनीच्या एकूण भागभांडवलापैकी 1.42 टक्के शेअर्स रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहेत.
फेडर बँकेचा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. 8 फेब्रुवारीला बँकेचा शेअर 1.60 रुपयांना होता. सध्या या शेअरची किंमत 179.35 रुपये इतरी आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी 23 वर्षांपूर्वी 1 लाख गुंतवले असतील त्याची रक्कम 1.22 कोटी झाली असेल. गेल्या एका वर्षातील शेअरची वाटचाल पाहिली असता 14 मार्च 2024 ला 139.80 रुपयांवर होता. तेव्हापासून त्यामध्ये 55 टक्क्यांची वाढ झाली होती. 5 डिसेंबरला हा शेअर 216.90 रुपयांवर पोहोचला होता. यानंतर शेअरमध्ये 17 टक्क्यांची घसरण झाली.
एग्री लोनमध्ये 49 टक्के आणि एसएमई कर्जात 20 टक्क्यांच्या तेजीच्या जोरावर डिसेंबरच्या तिमाहीत फेडरल बँकेचा ग्रॉस एडवान्स 15 टक्के वाढला आहे. डिसेंबरला संपलेल्या तिमाहिती वार्षिक आधारावर बँकेचं निव्वळ उत्पन्न 15 टक्क्यांनी वाढून 2431 कोटी रुपये झालं आहे. तर, बँकेचा निव्वळ नफा 955 कोटी रुपयांवर आला आहे.
जियोजीत बीएनपी पारिबासनुसार नव्या व्यवस्थापनामुळं बँकेचं लक्ष किफायतशीर क्वालिटी असेट आणि लायबिलिटी व्यवस्थापनावर आहे. ब्रोकरेजच्या मतानुसार शॉर्ट टर्ममध्ये आव्हानं दिसून येऊ शकतात. ब्रोकरेजनं फेडरल बँकेच्या शेअरचं टारगेट प्राईस 199 रुपये केलं आहे.
दरम्यान, भारतीय शेअर बाजारा दोन दिवसांच्या घसरणीनंतर तेजी पाहायला मिळत आहे. यामुळं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या























