IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड महामुकाबला, कसोटी सामन्यांमध्ये कुणाचं पारडं जड? आकडेवारी काय सांगते पाहा
India vs England : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. टेस्ट क्रिकेटमधील दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी जाणून घ्या.
IND vs ENG Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) कसोटी मालिका (Test Cricket) 25 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड यांच्यामधील पाच सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या टेस्ट सीरीजमधील पहिला सामना हैदराबादमधील (Hyderabad) राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये (Rajiv Gandhi International Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने अलिकडे कसोटी मालिकेत अफगाणिस्तानचा पराभव केला. आता टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 25 जानेवारी ते 29 जानेवारी यादरम्यान कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. टेस्ट क्रिकेटमधील दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी जाणून घ्या. भारताचा इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामन्यांमधील एकूण रेकॉर्ड बघितला तर भारताचं माप काहीसं झुकतं आहे. भारताने इंग्लंडविरोधात 131 सामने खेळले असून त्यापैकी फक्त 31 सामने जिंकले आहेत. त्यामुळे कसोटी मालिकेट टीम इंडियापेक्षा इंग्लंडचं पारड जड आहे.
भारत की इंग्लंड कुणाचं पारड जड?
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 31 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 50 सामने जिंकले आहेत. या दोघांमध्ये खेळलेले 50 सामनेही अनिर्णित राहिले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना जुलै 2022 मध्ये खेळला गेला होता. यामध्ये टीम इंडियाला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी सप्टेंबर 2021 मध्ये ओव्हल येथे खेळलेल्या सामन्सात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला होता.
कसोटीमध्ये सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर?
टीम इंडियासाठी इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरने 32 सामन्यात 2535 धावा केल्या आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टरच्या नावावर 7 शतके आणि 13 अर्धशतकेही आहेत. भारताच्या सध्याच्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. किंग कोहलीने 8 सामन्यात 1991 धावा केल्या आहेत, यामध्ये 5 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
टीम इंडियामध्ये कुणाला संधी?
भारताने पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये युवा खेळाडू यशस्वी जैस्वालचीही निवड करण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी जैस्वालचा रेकॉर्ड चांगला आहे. जैस्वालने टीम इंडियासाठी टी-20 सामनेही खेळले आहेत. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. गोलंदाजीची धुरा मुकेश कुमार आणि आवेश खान यांच्यावर सोपवण्यात आली आहे.