Hong Kong Sixes : स्टुअर्ट बिन्नी एकटा नडला... पाकिस्ताननंतर UAE ने भारतीय संघाला लोळवलं, उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं
हाँगकाँग सिक्स टूर्नामेंटमध्ये पराभवाने मोहिमेची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागले.
Hong Kong Sixes : हाँगकाँग सिक्स टूर्नामेंटमध्ये पराभवाने मोहिमेची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाला पूल सीच्या दुसऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE विरुद्ध 1 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अशाप्रकारे टीम इंडियाचे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे. प्रथम फलंदाजी करताना UAE ने 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 6 षटकांत 4 गडी गमावून केवळ 129 धावा करू शकला. अशाप्रकारे भारताला या स्पर्धेत पाकिस्ताननंतर UAE ने ही लोळवलं.
India needed 32 in 6 balls:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2024
Stuart Binny - 4,WD,6,6,6,6,1. India lost by just 1 run. 💔 pic.twitter.com/qyhKWWyqe6
UAE कडून खालिद शाहने 10 चेंडूत 6 षटकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी खेळली. तर जहूर खानने 11 चेंडूत 37 धावा केल्या. भारताकडून स्टुअर्ट बिन्नीने सर्वाधिक 3 बळी घेतले. भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी स्टुअर्ट बिन्नीने केली, ज्याने 3 बळी घेण्याव्यतिरिक्त 11 चेंडूत 44 धावांची खेळी केली. कर्णधार रॉबिन उथप्पाने 10 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांसह 43 धावा केल्या. भारताला शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती पण स्टुअर्ट बिन्नी धावबाद झाला आणि संघाचा सामना 1 धावांनी गमवावा लागला.
UAE BEAT INDIA BY 1 RUN IN THE HONG KONG SIXES...!!!! 🤯 pic.twitter.com/bcdLFrLSm8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2024
गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाला 1 नोव्हेंबर रोजी हाँगकाँग सिक्स क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात भरत चिपली दुखापतग्रस्त झाला पण पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याने 16 चेंडूत 53 धावांची तुफानी खेळी केली, ज्यामुळे भारताला निर्धारित 6 षटकांत 119 धावा करता आल्या. भारतीय कर्णधार रॉबिन उथप्पानेही 8 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. मात्र भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवत 120 धावांचे लक्ष्य गाठले.
हे ही वाचा -