Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी विशेष ओपन बस, वडोदरामध्ये जंगी स्वागत, रस्त्यांवर तुफान गर्दी, पाहा व्हिडीओ
Hardik Pandya Vadodara Road Show: भारतीय टी 20 संघाचा उपकॅप्टन हार्दिक पांड्या टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदा वडोदरा येथे दाखल जाला. यावेळी हार्दिक पांड्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.
Hardik Pandya Vadodara Road Show वडोदरा: भारतानं (Team India) टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विश्वविजेतेपद मिळवलं. भारताच्या या विजयामध्ये हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) योगदान महत्त्वाचं होतं. आज हार्दिक पांड्या वडोदरा या त्याच्या मूळ शहरात दाखल झाला. हार्दिक पांड्यांच्या स्वागतला जनसागर लोटला आहे. वडोदरा शहरामधील रस्त्यावर मोठा जनसमुदाय जमलेला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे भारतीय क्रिकेट टीमची नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून विजयी परेड काढण्यात आली होती. त्या प्रकारे वडोदरा शहरात ओपन बसमधून हार्दिक पांड्याची विजयी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. हार्दिक पांड्यानं तिरंगा हाती घेत स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केलं.
हार्दिक वर्ल्ड कप विजयानंतर प्रथमचं वडोदरामध्ये
टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ चार ते पाच दिवस उशिरानं भारतात दाखल झाला. बारबाडोसमधून स्पेशल विमानानं टीम इंडिया नवी दिल्लीत दाखल झाली. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीम इंडियानं भेट घेतली. त्याच दिवशी मुंबईत टीम इंडियाच्या विजयी परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. हार्दिक पांड्या यानंतर मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहिला होता. हार्दिक पांड्या सर्व कार्यक्रम आटोपून आज वडोदरा शहरात दाखल झाला. हार्दिकनं तशी इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. हार्दिकच्या जंगी स्वागताचं नियोजन करण्यात आलं होतं.
पाहा व्हिडीओ :
VIDEO | Cricketer Hardik Pandya (@hardikpandya7) attends a roadshow in Vadodara to celebrate Team India's T20 World Cup victory. pic.twitter.com/Qp4rFg3Mxl
— Press Trust of India (@PTI_News) July 15, 2024
हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी विशेष ओपन बसची व्यवस्था करण्यात आली आहे. हार्दिक पांड्यानं स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं. हार्दिक पांड्याचा रोड शो मांडवी पासून सुरु होऊन लहरीपुरा, सूरसागर आणि दांडिया बाजारातून पुढे नवलखी कम्पाऊंडमध्ये संपणार आहे. हार्दिक टीम इंडियाच्या जर्सीसह मिरवणुकीत सहभागी झाला होता. हार्दिकच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या बसवर वडोदराचा गौरव असं लिहिलं होतं. हार्दिकच्या स्वागतसाठी जमलेल्या जनसमुदायाच्या हातात देखील तिरंगा झेंडा पाहायला मिळाला. हार्दिकचा रोड शो 5 वाजता सुरु होणार होता. मात्र,तो सायंकाळी 6 वाजता सुरु झाला.
हार्दिक पांड्याच्या रोडशो साठी स्थानिक पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी वंदे मातरम गाणं देखील वाजवण्यात आलं. हार्दिक पांड्या ओपन बसमधून चाहत्यांकडून करण्यात येणाऱ्या अभिनंदनाचा स्वीकार करताना पाहायला मिळाला. काही वेळानंतर हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या देखील यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या रोडशोच लाईव्ह स्ट्रीमिंग देखील करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
Champions Trophy : तुम्ही आम्हाला लेखी द्या, बीसीसीआयकडे पीसीबीची अनोखी मागणी, वाचा काय घडलं?