Pak vs Eng 3rd Test : पंखे लावून पाकिस्तान इंग्लंडला हरवणार... रावळपिंडी कोसोटीपूर्वी बाई हा काय प्रकार
Pak vs Eng 3rd Test Rawalpindi Pitch : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे.
![Pak vs Eng 3rd Test : पंखे लावून पाकिस्तान इंग्लंडला हरवणार... रावळपिंडी कोसोटीपूर्वी बाई हा काय प्रकार eng vs pak 3rd test pakistan team try to turn the pitch of rawalpindi cricket stadium Cricket News Marathi Pak vs Eng 3rd Test : पंखे लावून पाकिस्तान इंग्लंडला हरवणार... रावळपिंडी कोसोटीपूर्वी बाई हा काय प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/22/cc9d097347d8e71e6625dd58d94b2c3d17295907293451091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pakistan vs England 3rd Test : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 असा सामना जिंकून बरोबरीवर आहेत. तिसरी कसोटी जिंकण्यासाठी पाकिस्तानचा संघ अशा युक्त्या आजमावत आहे ज्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मालिकेतील पहिला कसोटी सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, ज्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी पराभव केला. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तान संघाने दमदार पुनरागमन करत 152 धावांनी विजय मिळवला. आता तिसरी कसोटी जिंकण्यासाठी पाकिस्तान संघ रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठे बदल करत आहे.
🚨 The pitch for the third test match between Pakistan and England. pic.twitter.com/eGHEP8bG4C
— 𝙎𝙝𝙚𝙧𝙞 (@CallMeSheri1) October 21, 2024
तिसरा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. खेळपट्टी कोरडी करण्यासाठी मोठे पंखे आणि बाहेरील हीटर्सचा वापर केला जात आहे. रावपिंडीची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे. गेल्या सामन्यात पाकिस्तानने आपल्या फिरकी गोलंदाजांच्या जोरावरच सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून नोमान अली आणि साजिद खान यांनी प्रत्येकी 20 बळी घेतले. इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ 144 धावा करता आल्या.
Lgta ha pitch kisi Mistri nay bnai hai
— Azam-K (@Azamk555) October 22, 2024
Sheesha hoi hai
Aj ka sab say bara sawal ?
Kiya he pitch turn kregi or spinners ko help degi ? #PAKvsENG #pakveng pic.twitter.com/7rqjChHgf9
रावळपिंडीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना नाही अनुकूल
रावळपिंडीची खेळपट्टी सामान्यतः सपाट मानली जाते. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना फार कमी मदत मिळते. अशा परिस्थितीत पाकिस्तानी संघ पूर्ण तयारीनिशी या खेळपट्टीला टर्निंग ट्रॅक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. फिरकी चेंडू खेळताना इंग्लंडच्या फलंदाजांना सामान्यत: समस्यांना सामोरे जावे लागते.
Will it turn or will we see another flat deck in Pindi❓️
— PakPassion.net (@PakPassion) October 22, 2024
Here's the fresh look of the pitch⬇️#PakPassion #PAKvsENG pic.twitter.com/PwVaay7OW7
मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने सपाट खेळपट्टी बनवली होती. अशा स्थितीत इंग्लिश फलंदाजांनी या मैदानावर भरपूर धावा केल्या होत्या. या सामन्यात हॅरी ब्रूकने इंग्लंडकडून त्रिशतक झळकावले. याशिवाय जो रूटनेही द्विशतक झळकावले, त्यामुळे इंग्लंडने 823/7 धावा करून डाव घोषित केला आणि एक डाव आणि 47 धावांनी सामना जिंकला.
हे ही वाचा -
Jemimah Rodrigues : स्टार क्रिकेटर जेमिमाह रॉड्रिग्स वादाच्या भोवऱ्यात, वडिलांवर धर्मांतराचा आरोप, महिला क्रिकेट क्लबकडून मोठी कारवाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)