एक्स्प्लोर
चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वात वेगवान अर्धशतक, युवराज एकमेव भारतीय

1/5

युवराजने 32 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या.
2/5

युवराजने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. जे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात वेगवान पाचवं अर्धशतक आहे. तर भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा युवराज एकमेव फलंदाज ठरला आहे.
3/5

भारताकडून चार फलंदाजांनी अर्धशतक ठोकले. मात्र युवराजने त्याच्या वादळी अर्धशतकासह एक विक्रमही नावावर केला.
4/5

पावसामुळे सामना 48 षटकांचा करण्यात आला. युवराज बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्यानेही अखेरच्या षटकात हात धुवून घेतले. त्याने 6 चेंडूत 20 धावा ठोकल्या. याच खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 3 बाद 324 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य ठेवलं.
5/5

कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 81, रोहित शर्मा 91, शिखर धवन 68 आणि युवराज सिंहच्या 53 धावांच्या बळावर टीम इंडियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 324 धावांचं आव्हान ठेवलं.
Published at : 04 Jun 2017 10:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
