एक्स्प्लोर
Cyclone Amphan | झाडं, विजेचे खांब उन्मळले, घरं जमीनदोस्त; अम्फान चक्रीवादळामुळे 12 बळी

1/13

अम्फान चक्रीवादळामुळे घरांची मोठ्या प्रमाणाता पडझड झाल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.
2/13

ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं.
3/13

मोठ्य संख्येने वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडले, घरांचीही पडझड झाली.
4/13

अम्फान चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती.
5/13

6/13

हावडा आणि उत्तरेकडील 24 परगना जिल्ह्यात वृक्ष उन्मळून पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
7/13

पश्चिम बंगालच्या तुलनेत ओदिशामध्ये चक्रीवादळाचा कहर काहीसा कमी दिसला. ओदिशाच्या बालासौर, भद्रक आणि केंद्रपाडामध्ये सर्वाधिक परिणाम दिसला. परंतु या परिसरांमध्ये हवेचा वेग ताशी 110 किमीपेक्षा जास्त नव्हता. तरीही ओडिशामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं.
8/13

हावडा आणि उत्तरेकडील 24 परगना जिल्ह्यात वृक्ष उन्मळून पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
9/13

चक्रीवादळ धडकण्यापूर्वी प्रशासनाने पश्चिम बंगाल आणि ओदिशामधील जवळपास 6 लाख 58 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं.
10/13

हवामान विभागाने चक्रीवादळाच्या वाटचालीचा पुढचा अंदाज जारी केला होता. यानुसार अम्फान चक्रीवादळ ताशी 60 ते 70 किमी वेगाने बांगलादेशात पोहोचलं आहे. यानंतर बांगलादेशच्या सीमेवरुन बाहेर पडत मेघालय आणि आसाममध्ये हे वादळ शांत होईल.
11/13

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "बंगालचं झालेलं नुकसान शब्दात सांगता येणार नाही. किमान 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे. नेमकं किती नुकसान झालं याचा अंदाज बांधण्यासाठी अजून काही दिवस लागतील.
12/13

अम्फान चक्रीवाद काल दुपारी अडीचच्या सुमारास पश्चिम बंगालमधील दीघा आणि बांगलादेशमध्ये हटिया बेटाच्या किनाऱ्यावर धडकलं. चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात मोठं नुकसान झालं.
13/13

पश्चिम बंगालमध्ये बुधवारी (20 मे) ताशी 190 किमी वेगाने आलेल्या अम्फान चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. या वादळामुळे सुमारे 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं.
Published at : 21 May 2020 11:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
