एक्स्प्लोर
In Pics : जेमिसनच्या 'वादळा'पुढं टीम इंडियाची दाणादाण, टेस्ट वर्ल्डकप फायनलमध्ये आज काय घडलं?

1/8

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये सुरु आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पाण्यात गेल्यानंतर काल भारतानं तीन बाद 146 धावा केल्या होत्या. यात आज केवळ 71 धावांची भर टीम इंडियानं घातली. (Photo Source- @ICC)
2/8

भारताने दुसऱ्या दिवसअखेर 64.4 षटकात 3 विकेट्स गमावत 146 धावा केल्या होत्या. आज भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. (Photo Source- @BCCI))
3/8

भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलँडचा वेगवान गोलंदाज कायले जेमीसनने पाच विकेट घेतल्या. WTC_Final (Photo Source- @BLACKCAPS)
4/8

भारतीय संघानं 3 बाद 146 वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. विराट कालच्याच 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ऋषभ पंत केवळ धावा काढून माघारी परतला. विराटनंतर अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर बाद झाला. (Photo Source- @BCCI))
5/8

त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला दोनशेपार पोहोचवले. चांगली सुरुवात करणारा अश्विन 22 धावांवर बाद झाला. (Photo Source- @BCCI))
6/8

उपाहारानंतर जेमिसनने इशांत शर्माला (4) त्यानंतर जसप्रीत बुमराहला (0) लागोपाठ बाद केलं. शेवटी ट्रेंट बोल्टने रवींद्र जाडेजाला (15) धावांवर बाद करत भारताचा डाव 217 धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलँडचा वेगवान गोलंदाज कायले जेमीसनने पाच विकेट घेतल्या. तर बोल्ट आणि वॅगनरनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. WTC_Final (Photo Source- @BLACKCAPS)
7/8

साऊदम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला जात आहे. मात्र पहिल्या दिवशी साऊदम्पटनमध्ये पाऊस झाल्यानं क्रीडा प्रेमींची निराशा झाली. पावसाच्या बॅटिंगमुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे वाया गेला. (Photo Source- @BCCI)
8/8

पावसामुळे आणि आऊट फिल्डवर पावसाचे पाणी असल्याने सामना खेळला गेलाच नाही.पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना सुरू करणे शक्य होणार नसल्याचे सांगितलं. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. (Photo Source- @BCCI)
Published at : 20 Jun 2021 07:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
विश्व
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
