एक्स्प्लोर
KKR vs SRH: कोलकाता अन् हैदराबाद आयपीएल ट्रॉफीसाठी भिडणार, पावसाची किती शक्यता? लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहणार...
IPL 2024 Final, SRH vs KKR : आयपीएल फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद यांच्यात लढत होईल. दोन्ही संघ चेन्नईत आमने सामने येतील.

कोलकाता नाईट रायडर्स, सनरायजर्स हैदराबाद
1/6

आयपीएलच्या 17 व्या पर्वाचा विजेता कोण हे रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅचनंतर ठरणार आहे. एमए. चिदंबरम स्टेडियममध्ये मॅच होणार आहे. दोन्ही टीम आपआपल्या बेस्ट खेळाडूंसह मैदानात उतरतील.
2/6

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅचपूर्वी इथं क्वालिफायर-2 ची मॅच झाली होती. त्या मॅचमध्ये वेगवान गोलंदाजांसह स्पिनर्सना देखील फायदा झाला होता. त्यामुळं फायनलमध्ये देखील गोलंदाजांचं वर्चस्व राहू शकतं.
3/6

आयपीएल फायनलच्या दिवशी तापमान अधिक राहू शकतं. फायनलची मॅच सुरु असताना 3 टक्के पावसाची शक्यता आहे.फायनलच्या पूर्वसंध्येला देखील पावसानं इथं हजेरी लावली आहे.
4/6

आयपीएल फायनल भारतात टीव्हीवर पाहायची असल्यास स्टार स्पोर्टस नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर पाहू शकतात.मोबाईल वर पाहण्यासाठी जिओ सिनेमावर देखील फायनल पाहू शकता.
5/6

केकेआरची संभाव्य टीम: श्रेयस अय्यर (कॅप्टन), सुनील नरेन, रहमानुल्लाह गुरबाझ,व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमनदीप सिंग, मिशेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती (नितीश राणा : इम्पॅक्ट प्लेअर)
6/6

हैदराबादची संभाव्य टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, राहुल त्रिपाठी, नितीशकुमार रेड्डी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाझ अहमद, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, जयदेव उनाडकट, उमरान मलिक
Published at : 26 May 2024 12:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
