एक्स्प्लोर
IPL 2022 : 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित, कोणत्या संघाची स्थिती काय?

गुजरात टायटन्स
1/10

यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ सामिल झाले असून या 10 पैकी 4 संघ पुढील फेरीत पोहोचतील. यात गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्याती केवळ एक सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांनी एकूण आठ सामना जिंकल्याने त्याच्या खिशात 16 गुण असून त्यामुळे त्याचं पुढील फेरीत जाणं जवळपास निश्चित झालं आहे.
2/10

त्याचनुसार नव्याने आयपीएलमध्ये सामिल झालेल्या लखनौ संघाने देखील आतापर्यंत 10 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्या उर्वरीत 4 सामन्यांपाकी त्यांनी एकही सामना जिंकल्यास ते पुढील फेरीत नक्कीच पोहचू शकतात.
3/10

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने गमावले आहेत. त्यामुळे ते केवळ 2 गुणांसह दहाव्या स्थआनवर आहेत. त्यामुळे ते त्याचे उर्वरीत सहाच्या सहा सामने जिंकल्यासही प्लेऑफमध्ये पोहचू शकत नाहीत.
4/10

त्याचनुसार चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघानी त्याचे 6-6 सामने गमावले आहेत.
5/10

त्यामुळे त्यांना त्यांचे उर्वरीत सर्वच्या सर्व सामने चांगल्या रनरेटनी जिंकावे लागेल, त्यामुळे त्यांच पुढील फेरीत पोहोचणं अवघडचं आहे.
6/10

वरील पाच संघ सोडल्यास उर्वरीत राजस्थान, हैदराबाद, दिल्ली, पंजाब आणि बंगळुरु या संघामध्ये पुढील फेरीत पोहचण्याची चुरस आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.
7/10

तसंच सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाने प्रत्येकी 5-5 सामने जिंकत ते देखील पुढील फेरीत पोहचण्याच्या जवळ आले आहे.
8/10

त्यामुळे बंगळुरु-हैदराबाद या दोघांनाही उर्वरीत सामन्यात कमाल कामगिरी करणं महत्त्वाचं आहे.
9/10

तर या शर्यतीत सर्वात मागे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स असून त्यांनी 4-4 सामनेच केवळ जिंकले आहेत.
10/10

त्यामुळे या उर्वरीत संघाना शक्य तितके अधिक सामने जिंकून पुढील फेरीत पोहचण्याची संधी आहे.
Published at : 03 May 2022 06:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
विश्व
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
