एक्स्प्लोर
Champions Trophy Australia : चॅम्पियन ट्रॉफीपूर्वीच कांगारू उध्वस्त; एक, दोन नाही तर कर्णधारासह 5 धक्के, टीम इंडियाचा चॅम्पियन्स होण्याचा मार्ग मोकळा?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा 19 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघातील 5 खेळाडूंनी संघाचे टेन्शन वाढले आहे.

ICC Champions Trophy Australia
1/7

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा 19 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघातील 5 खेळाडूंनी संघाचे टेन्शन वाढले आहे.
2/7

कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल मार्श, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, कॅमेरॉन ग्रीन आणि मार्कस स्टोइनिस चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत.
3/7

मार्कस स्टोइनिसने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
4/7

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळल्याची अधिकृत घोषणा केली आहे. हे दोन्ही खेळाडू टीम इंडियासोबत खेळलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये जखमी झाले होते.
5/7

ज्यामुळे हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नाहीत. कमिन्स घोट्याच्या दुखापतीशी झुंजत असताना, हेझलवूड अद्याप त्याच्या पायाच्या दुखापतीतून बरा झालेला नाही. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या पाच खेळाडूंऐवजी ऑस्ट्रेलियन संघात कोणाला संधी मिळते हे पाहणे बाकी आहे.
6/7

ऑस्ट्रेलिया संघ निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले की, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल मार्श दुखापतींनी ग्रस्त आहेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ते वेळेवर बरे होऊ शकणार नाहीत. हे निराशाजनक असले तरी, वर्ल्ड स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी इतर खेळाडूंना ही एक उत्तम संधी असेल."
7/7

दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 13 दिवस आधी, मार्कस स्टोइनिसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्यचकित केले. स्टोइनिस म्हणाला की, त्याला टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि ही त्याच्यासाठी योग्य वेळ आहे. स्टोइनिसने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.
Published at : 06 Feb 2025 06:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion