एक्स्प्लोर
India: कर्जत ते पाटना... भारतातील रेल्वेस्थानकं 'या' खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध; खवय्यांची होते स्थानकांवर गर्दी
India: भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळी संस्कृती, विविध पाककृती, विविध परंपरा... त्यामुळेच भारतच्या विविध प्रांतांतील रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्येही विविधता पाहायला मिळते.

India Railway Station and Famous Food
1/11

भारतातील काही रेल्वे स्थानकं ही तेथील प्रचलित खाद्यपदार्थांसाठी (Local Food) प्रसिद्ध आहेत. तर आज अशाच विविध खाद्यपदार्थ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रेल्वेस्थानकांबद्दल जाणून घेऊया.
2/11

कर्जत: वडा पाव हा देशातच नाही, तर जगात प्रसिद्ध आहे. पण कर्जत स्टेशनवर मिळणार वडापाव काही खास आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील कर्जत स्थानकावरून जात असाल तर येथील वडा पाव नक्की ट्राय करा.
3/11

जालंधर: जर तुम्ही पंजाबला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करत असाल, तर जालंधर रेल्वेस्थानकावर मिळणारे छोले भटुरे नक्कीच चाखून पाहा, कारण इथे मिळणारे छोले भटुरे हे स्वादिष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहेत.
4/11

अजमेर: राजस्थानमध्ये जाण्याचा प्रसंग आलाच तर अजमेर रेल्वेस्थानकावर मिळणारी कढी-कचोरी नक्की खाऊन पाहा. येथील हा पदार्थ खूप फेमस आहे.
5/11

रतलाम: जर तुम्ही मध्य प्रदेशला जाणार असाल आणि तेथील रतलाम रेल्वेस्थानकावर उतरणार असाल, तर येथील कांदा पोहे जरुर खाऊन पाहा. मध्य प्रदेशातील बहुतांश लोकांची सकाळची सुरुवात कांदे पोह्याने होते. यामुळे या रेल्वेस्थानकावरील कांदे पोहे प्रवाशांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.
6/11

पाटना: बिहारला जाऊन लिठ्ठी चोखा खाण्यात वेगळीच मज्जा आहे. जर तुम्ही राजधानी पाटना रेल्वेस्थानकावर थांबलात तर येथे मिळणाऱ्या लिठ्ठी चोखाचा आस्वाद नक्की घ्या.
7/11

image 3
8/11

टूंडला: दिल्लीहून कानपूरला ट्रेनने जात असाल तर त्यादरम्यान तुम्हाला टूंडला स्टेशन लागेल, जर ट्रेन इथे काहीवेळ थांबली, तर येथे मिळणारी टिक्की नक्की ट्राय करा.
9/11

टुंडला रेल्वेस्थानकावर मिळणाऱ्या टिक्कीची चव इतकी भारी असते की तुम्ही बोटं चाटत बसाल.
10/11

अबू रोड स्टेशन: राजस्थानच्या अबू रोड स्टेशनवर जाण्याचा योग आला तर तेथील रबडी नक्की खाऊन पाहा. इथली थंड आणि मऊ रबडी चाखली तर त्याची चव आयुष्यभर विसरता येणार नाही.
11/11

टाटानगर: झारखंडमधील टाटानगर जंक्शनच्या कॅन्टीनमध्ये फिश करी मिळते, जी रेल्वे प्रवाशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. भातासह मिळणाऱ्या या फिश करीचा आनंद घेण्यासाठी अनेक प्रवासी या रेल्वेस्थानकावर थांबतात.
Published at : 01 Oct 2023 07:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
