एक्स्प्लोर
PHOTO : पुरोगामी संघटनांकडून आज सांगली बंदची हाक
Sangli Bandh : सांगली शहरात बहुजन समाजातील महामानवांच्या बदनामीच्या निषेधार्थ आणि महापुरुषांच्या सन्मानार्थ सर्व पुरोगामी संघटनाकडून सांगली शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

Sangli Bandh
1/6

सांगली शहरात बहुजन समाजातील महामानवांच्या बदनामीच्या निषेधार्थ आणि महापुरुषांच्या सन्मानार्थ सर्व पुरोगामी संघटनाकडून सांगली शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
2/6

सनदशीर मार्गाने सर्व पुरोगामी संघटनाकडून हा निषेध व्यक्त केला जाणार असून त्यासाठी सर्व संघटना मधील कार्यकर्ते, शिवप्रेमी, बाबासाहेब आंबडेकर प्रेमी स्टेशन चौक सांगली येथे सकाळी 10 वाजता एकत्र जमणार आहेत.
3/6

तिथून मारुती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यत पदयात्रा काढून महाराजाना वंदन केले जाणार आहे.
4/6

याचवेळी शहरातील बाबासाहेब आंबडेकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अन्य महापुरुषांच्या पुतळ्यला देखील अभिवादन केले जाणार आहे.
5/6

महामानवांच्या बदनामीच्या निषेधार्थ याआधी 17 डिसेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्या विरोधात आणि निषेधार्थ ठिय्या आंदोलन केले होते.
6/6

आता या निषेध आंदोलनाचा दूसरा टप्पा म्हणून महापुरुषांच्या सन्मानार्थ अत्यावश्यक सेवा वगळून सांगली बंद ठेवण्याचा सर्व पुरोगामी संघटनानी आज निर्णय घेतला आहे.
Published at : 22 Dec 2022 10:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
क्राईम
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
