एक्स्प्लोर

Celebrity MasterChef Winner: फिनालेपूर्वीच Celebrity MasterChef चा विनर जाहीर? कधी खाण्यालायकही नव्हती डिश अन् आता...

Celebrity MasterChef Winner: सेलिब्रिटी मास्टरशेफचा हा पहिला सीझन आहे आणि लोकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सना स्वयंपाकघरात धावपळ करुन वेगवेगळे पदार्थ तयार करताना पाहणं पसंत पडतंय. 

Celebrity MasterChef Winner: सध्या सोनी लिव्हवर सुरू असलेलं 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' भलतंच चर्चेत आहे. अशातच आता या शोला त्याचा विजेता मिळणार आहे. सेलिब्रिटी परिक्षकांना इम्प्रेस करण्यासाठी आणि शो जिंकण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत. सेलिब्रिटी मास्टरशेफचा हा पहिला सीझन आहे आणि लोकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सना स्वयंपाकघरात धावपळ करुन वेगवेगळे पदार्थ तयार करताना पाहणं पसंत पडतंय. 

सेलिब्रिटी बनवतायत नवनवे पदार्थ

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोचा टीआरपी फारसा चांगला नाही, बरेच लोक शोचे व्हिडीओ ऑनलाईन शेअर करत आहेत. ते स्पर्धकांवर आणि त्यांच्या जेवणावर त्यांचं मत देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, हा शो प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि फिल्म प्रोड्युसर फराह खान होस्ट करत आहे. 

शोचे स्पर्धक 

शेफ रणवीर ब्रार आणि शेफ विकास खन्ना हे या शोचे परीक्षक आहेत. या शोमध्ये स्पर्धक म्हणून तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, गौरव खन्ना, दीपिका कक्कर, अर्चना गौतम, उषा नाडकर्णी, राजीव अदातिया, कविता सिंह, फैसल शेख उर्फ ​​मिस्टर फैसू, अभिजीत सावंत, आयशा झुल्का आणि चंदन प्रभाकर आहेत. यातील काही सेलिब्रिटी एलिमिनेशननंतर शोमधून बाहेर पडलेत. 

टॉप 5 फायनलिस्ट 

अभिजीत, चंदन, आयशा आणि कविता हे शोमधून एलिमिनेट झालेत. तर, दीपिकानं तिच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे शो सोडत असल्याचा खुलासा केला आहे. या शोचे अनेक BTS व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर फायरल होत असतात. तेजस्वी, गौरव, निक्की, फैसू आणि राजीव हे शोमधले टॉप 5 फायनलिस्ट असल्याचं बोललं जात आहे. 

ग्रँड फिनालेचं शुटिंग पूर्ण

ग्रँड फिनालेचे शुटिंग पूर्ण झालं असून सर्व फायनलिस्टना सोनेरी अ‍ॅप्रन घातलेले दिसून आले आहेत. इंडिया फोरम्सनं दिलेल्या ताज्या वृत्तानुसार, अनुपमा फेम अभिनेता गौरव खन्नानं सेलिब्रिटी मास्टरशेफ जिंकला आहे. शोमधील त्याचा प्रवास अद्भुत होता. पहिल्या भागात, त्याला सांगण्यात आलेली की, त्याची डिश खाण्यायोग्य नाही आणि शेवटच्या आठवड्यात त्यानं स्वतःमध्ये बदल घडवून थेट 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

सेलिब्रिटी मास्टरशेफचे टॉप 3 कोण? 

रिपोर्ट्सनुसार, गौरव खन्ना हा सेलिब्रिटी मास्टरशेफचा विजेता ठरला आहे. तर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही पहिली रनरअप आहे. निक्की तांबोळी या शोची दुसरी रनरअप ठरली आहे. दरम्यान, हे वृत्त मीडिया रिपोर्ट्सनुसार देण्यात आलं असून यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Govindas Wife Sunita Ahuja: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान गोविंदाच्या पत्नीचा OTT डेब्यू; करण जोहरच्या 'या' वेब सीरिजमध्ये झळकणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंतचा धडाकेबाज पोलिसी खाक्या, पोस्टरसह टीझरही समोर, कधी होणार रिलीज?
‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंतचा धडाकेबाज पोलिसी खाक्या, पोस्टरसह टीझरही समोर, कधी होणार रिलीज?
रीलवर केलेल्या एका लाईकवरून यामी गौतम कृती सेननमध्ये कोल्ड वॉर? यामीनं थेट पोस्ट लिहिली ..
रीलवर केलेल्या एका लाईकवरून यामी गौतम कृती सेननमध्ये कोल्ड वॉर? यामीनं थेट पोस्ट लिहिली ..
Charak Fair of Faith Review: चरक ‘कांतारा’ची डुप्लिकेट नव्हे तर पायरेटेड कॉपी? पूर्ण चित्रपट पाहणंही ठरेल कठीण
चरक ‘कांतारा’ची डुप्लिकेट नव्हे तर पायरेटेड कॉपी? पूर्ण चित्रपट पाहणंही ठरेल कठीण

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget