Chhatrapati Sambhajinagar Accident: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ऊसाचा ट्रक पलटी, 17 मजूर ऊसाच्या मोळ्यांखाली दबले, 6 जणांनी तडफडत प्राण सोडले
Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगर जिल्यातून आघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या कन्नड पिशोर रस्त्यावर उसाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगर जिल्यातून आघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या कन्नड पिशोर रस्त्यावर उसाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Accident News) उसाच्या ट्रक खाली 17 मजूर दबले असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय, तर 11 जण जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे. रात्री 12 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहे. मात्र मजूरांवर एकाएकी काळानं घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
17 मजूर ऊसाच्या मोळ्यांखाली दबले, 6 जणांनी तडफडत प्राण सोडले
पुढे आलेल्या माहितीनुसार, उसाने भरलेल्या ट्रकवर 17 मजूर बसून चालले होते. त्यावेळी अचानक ट्रक पलटी झाला आणि त्यामूळे मजूर उसाखाली दबले. मात्र मध्यरात्रीची वेळ असल्याने आणि वर्दळ कमी असल्याने वेळीच मदत मिळू शकली नाही. किंबहुना उपस्थित लोकांनी या मजुरांना बाहेर काढत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. त्यातील 13 मजुरांना वाचवण्यात यश आले. मात्र दुर्देवाने यात 4 मजूर ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र ही घटना नेमकी कशी आणि कुणाच्या चुकीमुळे झाली याचा तपास पोलीस करत आहे. किसन धन्नू राठोड, मनोज नामदेव चव्हाण, विनोद नामदेव चव्हाण, मिथुन महारू चव्हाण, कृष्णा मुलचंद राठोड (सर्व रा. सातकुंड) व ज्ञानेश्वर देविदास चव्हाण (रा. बेलखेडा ह. मु. सातकुंड ता. कन्नड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव असल्याचे समजतंय.
अकोल्यात दोन कारमध्ये भीषण अपघात
अकोला शहरातील अशोका वाटिका चौकात मध्यरात्रीनंतर (9 मार्च) घडलाय. शहरातील नवीन आळशी प्लॉट भागातून जिल्हाधिकारी कार्यालय चौकाकडे भरधाव येत असलेल्या कारने एका कारला जोरदार धडक दिलीय. त्यानंतर अनियंत्रित कार थेट चौकातील सिग्नलच्या खांबाला धडक देत डिव्हायडरवर चढलीय. यात दोन्ही कारमधील तीनजण गंभीर जखमी झालेय. त्यांच्यावर अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरूयेत. भरधाव वेगाने आलेली कार ही नवीन आळशी भागातील वोरा नामक व्यक्तीची असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये. गाडीचा वेग अनियंत्रित का झालाय?. गाडी चालकाने मद्यसेवन केले होतेय काय?, याचा शोध पोलीस घेतायेत. या अपघातात दोन्ही कारचं मोठं नुकसान झालंय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा
























