Maharashtra News Live: भर रस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्याला एक दिवसाची पोलीस कोठडी
Maharashtra News Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. आज राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर होणार आहे.

Background
Maharashtra Budget 2025: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात नेमकं काय असणार, याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात नव्या गोष्टी समोर येण्याची शक्यता.
विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा
- दि. 11, 12,13 मार्चला विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा
- 12, 13 मार्चला चंद्रपूर जिल्ह्यात देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा
- सध्या विदर्भातील सर्वच जिल्ह्याचा पारा 37 डिग्रीच्या पार
- पुढच्या दोन तीन दिवसात चंद्रपूर, अकोल्याचे तापमान 40 अंश पार जाण्याची शक्यता
- यंदा सामान्य पेक्षा 3 ते 4 डिग्री ने पारा वाढणार, साधारण 36 डिग्री पर्यंत मार्च महिन्यात विदर्भातील तापमान असते.
- हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
एमएमआरडीएवर गंभीर आरोप करणाऱ्या कंपनीनं हायकोर्टातील याचिका घेतली मागे
एमएमआरडीएवर गंभीर आरोप करणाऱ्या कंपनीनं हायकोर्टातील याचिका मागे घेतली
हायकोर्टाच्या निर्देशांनुसार म्हणणं एकून घेण्यासाठी समितीची स्थापना
त्यामुळे एकिकडे पुन्हा चर्चा सुरू असताना याचिका प्रलंबित ठेवणं योग्य नसल्याचं कंपनीकडून स्पष्टीकरण
मुंबई मेट्रोच्या सल्लागार सेवेसाठी नेमलेल्या 'सिस्त्रा' या फ्रेंच कंपनीनं एमएमआरडीएटच्या वरिष्ठांवर केले होते भ्रष्टाचाराचे आरोप
नोटीस न देताच या कंपनीचं कंत्राट अचानक रद्द केल्याच्या निर्णयाला कंपनीनं दिलं होतं हायकोर्टात आव्हान
हायकोर्टानं कंपनीची याचिका मान्य करत कंत्राट रद्द करण्याचे एमएमआरडीएचे आदेश रद्द केले होते
तसेच कंपनीचं म्हणणं पुन्हा सविस्तर ऐकून घेण्याचेही दिले होते एमएमआरडडीएला निर्देश























