Numerology: चुकीच्या निर्णयाचा ज्यांना आयुष्यभर होतो पश्चाताप! या जन्मतारखेचे लोक विचार करण्यातच वेळ वाया घालवतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
Numerology: अंकशास्त्रानुसार त्या जन्मतारीखांबद्दल जाणून घ्या, जे लोक अत्यंत विचार करतात, आणि आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. जाणून घ्या सविस्तर..

Numerology: आपण अनेकदा पाहतो, आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात, जी विविध स्वभावाची, विविध व्यक्तीमत्त्वाची असतात. तसं पाहायला गेलं तर आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचं असतं. समाजात त्यांचं नाव असले पाहिजे. आजूबाजूच्या लोकांनी त्याला ओळखले पाहिजे. तो कुठेही गेला तरी त्याच्या मागे चाहत्यांची गर्दी असली पाहीजे, असं अनेकांना वाटतं. काही लोक जीवनात उच्च स्थान मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करतात, तर काही लोक आपला सगळा वेळ फक्त विचार करण्यात घालवतात. असे काही लोक असतात जे म्हणतात की, ते हे किंवा ते करतील असं बोलून दाखवतात खरं.. पण जेव्हा ते काम करण्याची वेळ येते तेव्हा ते काहीच करू शकत नाहीत. अंकशास्त्रानुसार जाणून घ्या
'या; लोकांना कधीच यश मिळत नाही?
अंकशास्त्राच्या मदतीने, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख पाहून त्याच्याबद्दल बरेच काही जाणून घेता येते. जाणून घेऊया त्या जन्मतारीखांबद्दल, ज्या दिवशी जन्मलेले लोक त्यांचा सर्व वेळ विचार करण्यात वाया घालवतात. ज्यामुळे त्यांना जीवनात यश मिळत नाही. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 4, 7, 8, 11, 13, 16, 17, 20, 22, 25, 26 आणि 29 तारखेला जन्मलेले लोक खूप विचार करतात. हे लोक आपला सगळा वेळ विचार करण्यात वाया घालवतात आणि जेव्हा प्लॅन बनवतात तेव्हा त्यात मागे पडतात. त्यांच्या मनात अनेक योजना आहेत, पण त्या अंमलात आणण्यात अनेकदा असमर्थ ठरतात. सुरुवातीला हे लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतात. पण हळूहळू ते निष्काळजीपणा दाखवू लागतात, त्यामुळे त्यांना त्या कामात कधीच यश मिळत नाही.
घाईगडबडीत अनेकदा चुकीचे निर्णय घेतात,
अंकशास्त्रानुसार, हे लोक अनेक वेळा घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेतात, ज्याचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप होतो. याशिवाय या जन्मतारखांना जन्मलेले लोक इतरांवर जास्त अवलंबून असतात त्यामुळे त्यांची अनेकदा फसवणूक होते.
हे लोक अभ्यासात तरबेज!
अंकशास्त्रात असे म्हटले आहे की, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला होतो ते अभ्यासात निपुण असतात. हे लोक कोणतेही काम करतात, ते पूर्ण करूनच सोडतात. हे लोक आपल्या कामाशी प्रामाणिक असतात. हे लोक संयमाने आणि शांतपणे त्यांच्या ध्येयांसाठी कठोर परिश्रम करतात. त्यामुळे ते सहजपणे आयुष्यात मोठी उंची गाठतात.
हेही वाचा>>
Shani Dev: हुश्श...शनिच्या साडेसातीपासून 'या' राशींची सुटका! तर 'या' राशींनी सावधान, डोकेदुखी वाढणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















