Govindas Wife Sunita Ahuja: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान गोविंदाच्या पत्नीचा OTT डेब्यू; करण जोहरच्या 'या' वेब सीरिजमध्ये झळकणार?
Govindas Wife Sunita Ahuja: गोविंदा बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसला नाही. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

Govindas Wife Sunita Ahuja: बॉलिवूड सुपरस्टार (Bollywood Superstar) गोविंदा (Govinda) बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. पण चाहते त्याच्या धमाकेदार कमबॅकची वाट पाहत आहेत. सध्या गोविंदा त्याच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) 37 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता आणखी एक गोंधळात टाकणारी माहिती समोर येत आहे. गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा लवकरच ओटीटी डेब्यू करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नेटकरीही पुरते गोंधळात पडले आहेत.
गोविंदा बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये दिसला नाही. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशातच हे जोडपं घटस्फोट घेणार आहे. पण सुनीतानं या चर्चांना केवळ अफवा म्हटले आहे. तसेच, तिच्या आणि गोविंदामध्ये सर्व काही ठीक असल्याचं म्हटलं आहे. या चर्चा कुठे शांत होत नाहीत, तोवर लगेचच सुनीता अहुजा अॅक्टिंगमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. "फॅब्युलस लाईव्हज वर्सेस बॉलीवूड वाईव्हज" या करण जोहरच्या सुपरहिट शोमच्या पुढच्या सीझनसाठी सुनीता अहुजासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीता अहुजा "फॅब्युलस लाईव्हज वर्सेस बॉलीवूड वाईव्हज"च्या पुढच्या सीझनमध्ये दिसणार आहे. असं म्हटलं जातंय की, प्रेक्षकांना सुनीता अहुजाला ऐकायला आणि पाहायला आवडेल. तसेच, सध्या त्यांचे फॅन फॉलोइंगही वाढत आहे. सुनीता अहुजा सध्या खूप आनंदी आहे आणि तिचे विचार मनमोकळेपणानं मांडताना दिसतेय. दरम्यान, सुनीता शोमध्ये दिसणार की नाही? याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.
घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
View this post on Instagram
अलिकडेच जेव्हा सुनीतानं गोविंदापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली, तेव्हा असंही ऐकायला मिळालं की, अभिनेत्याचं नाव एका मराठी अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. 6 महिन्यांपूर्वी सुनीतानं घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याचंही समोर आलं. पण नंतर दोघांमध्ये सर्व काही ठीक झालं आणि दोघेही आता त्यांच्या नात्यात आनंदी आहेत. खरंतर, सुनीता आणि गोविंदा वेगवेगळ्या घरात का राहतात? असा प्रश्न लोक उपस्थित करू लागले, तेव्हा हा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
गोविंदा, सुनीता वेगवेगळ्या घरात राहतात
दरम्यान, सुनीता आहुजा यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, त्यांची मुलगी मोठी होत होती आणि बरेच लोक गोविंदाला भेटायला यायचे. त्याला भेटण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचा सतत ओघ सुरू होता. म्हणूनच त्यांनी दुसऱ्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. गोविंदा सुनीता ज्या घरात राहते, त्या घरापासून फक्त 100 पावलांच्या अंतरावर राहतो. अशातच जर सुनीता या रिअॅलिटी शोचा भाग बनली तर तिच्या चाहत्यांसाठी ते नक्कीच खूप मजेदार असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे गोविंदावर कोसळला दुःखाचा डोंगर; ढसाढसा रडला अभिनेता





















