एक्स्प्लोर
Kolhapur News: राजर्षी शाहू स्मृतीशताब्दी वर्ष सांगता; शाहू मिलमध्ये 'महाराष्ट्राची लोकधारा' कार्यक्रमाने आणली रंगत
Kolhapur News: लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता निमित्त शाहू मिलमध्ये 'महाराष्ट्राची लोकधारा' हा कार्यक्रम पार पडला.

Kolhapur News
1/10

लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता निमित्त कोल्हापुरातील शाहू मिलमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
2/10

'महाराष्ट्राची लोकधारा' हा कार्यक्रम मंगळवारी संध्याकाळी पार पडला.
3/10

या कार्यक्रमाचे उद्घाटन ख्यातनाम सिने-नाट्य अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते झाले.
4/10

महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती सांगणाऱ्या या कार्यकमाची सुरुवात भोपाळीने झाली.
5/10

या कार्यक्रमात भोपाळी, लावणी ,अध्यात्मिक गीते, भजन जागर -गोंधळ, पोवाडा, शौर्य गीते, भारुड सादर करण्यात आले.
6/10

त्यामुळे गीत-गायनाने शाहू मिलचा परिसर आनंदून गेला.
7/10

भालकर्स अकादमीचे संजय भालकर आणि त्यांच्या टीमने या कार्यक्रमाद्वारे शाहू कृतज्ञता पर्वात रंगत आणली.
8/10

कार्यक्रमाच्या शेवटी एक गरीब मिल कामगार व छत्रपती शाहू महाराज हे एकमेकांना अन्नाचा घास भरवितात हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थित प्रेक्षक गलबलून गेला.
9/10

या संगीतमय रजनीला गायक संगीत संयोजक महेश सोनुले, गायिका विदा सोनुले, बाल शाहीर सारंग सोनुले 'शाहीर कृष्णात पाटील तर ढोलकी गुरु ढोले ,ऑक्टोपॅड स्वानंद जाधव, कीबोर्डवर प्रदीप फिरंगे यांनी साथ दिली.
10/10

तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला रसिक, प्रेक्षक मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
Published at : 10 May 2023 12:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
