मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
तरुणाने पीडितेला गोड बोलून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. काही दिवसांनी दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले. मात्र, त्यानंतर मित्रांसोबत झोपण्यासाठी दबाव टाकू लागल्यानंतर संतापजनक प्रकार समोर आला.

Wife pressured to have relation with friends : प्रेम, सेक्स आणि विश्वासघाताच्या प्रकरणांनी देशभरात खळबळ माजली असतानाच आता आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. मिस्ड कॉलने सुरू झालेले प्रेम विश्वासघाताने संपलं आहे. एका अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर मिस्ड कॉल आला होता. परत फोन केला असता पलीकडे एका तरुणाचा फोन आला. पहिल्या दिवशी फक्त औपचारिक बोलणी झाली. यानंतर दोघेही सतत फोनवर बोलू लागले. तरुणाने पीडितेला गोड बोलून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. काही दिवसांनी दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले. मात्र, त्यानंतर मित्रांसोबत झोपण्यासाठी दबाव टाकू लागल्यानंतर संतापजनक प्रकार समोर आला. बिहारमधील किशनगंजमध्ये ही घटना घडली.
मित्रांसोबत झोपण्यासाठी दबाव टाकला
लग्नानंतर आरोपी शकीलने पीडितेला रोजगारासाठी हरियाणात नेले. तिथं भाड्याने खोली घेतली आणि पती-पत्नीसारखे राहू लागले. शकीलचे काही मित्र पीडितेच्या घरी जात होते. त्यानंतर एक दिवस शकीलने पीडितेवर त्याच्या मित्रांसोबत बेड शेअर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. पीडितेने नकार दिल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. दरम्यान, शकीलने पत्नीसोबतचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड करून पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पण एके दिवशी संधी मिळताच पीडित मुलगी शकीलच्या तावडीतून सुटली आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तिच्या आई-वडिलांच्या घरी परतली.
पीडितेने घटनेची माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसात केली. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महिला पोलिस स्टेशनच्या प्रमुख सुनीता कुमारी यांनी सांगितले की, पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























