एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Football : रोमहर्षक लढतीत 'दिलबहार'ने पटकावला सतेज चषक; बालगोपाल ठरला उपविजेता
Kolhapur Football : दिलबहार तालीम मंडळाने रोमहर्षक लढतीत बालगोपाल तालीम मंडळाचा पराभव करत सतेज चषक पटकावला. निर्धारित वेळेत सामना 1-1 बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये दिलबहारने 3-1 ने विजय मिळवला.

Kolhapur Football
1/11

दिलबहार तालीम मंडळाने बालगोपाल तालीम मंडळाचा पराभव करत सतेज चषक पटकावला.
2/11

दोन मातब्बर संघांचा खेळ पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी खचाखच गर्दी केली होती.
3/11

दिलबहारच्या शुभम घराळेनं चार पेनल्टी रोखत विजयाचा मार्ग प्रशस्त केला.
4/11

निर्धारित वेळेत सामना 1-1 बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये दिलबहारने 3-1 ने विजय मिळवला.
5/11

विजेत्या दिलबहार तालीम मंडळास व उपविजेत्या बालगोपाल तालीम मंडळास तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
6/11

यावेळी बुलेटने आमदार ऋतुराज पाटील यांनी राईड मारली.
7/11

यावेळी रोहित आर.पाटील, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, राजू लाटकर, डॉ. भारत कोटकर, भूपाल शेटे यांच्यासह पीटीएम फुटबॉल संघाचे अध्यक्ष शरद माळी, कार्याध्यक्ष संपत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
8/11

या स्पर्धेतून फुटबॉलप्रेमी कोल्हापूरकरांना फुटबॉलची पर्वणी अनुभवायला मिळाली.
9/11

फुटबॉलप्रेमींना लकी ड्राॅच्या माध्यमातून बक्षीस देण्यात आले.
10/11

विजेत्या दिलबहार संघात 2 लाख रुपये व सतेज चषक देण्यात आला.
11/11

उपविजेत्या बालगोपाल संघात 1 लाख आणि चषक देण्यात आला.
Published at : 06 Mar 2023 12:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
