एक्स्प्लोर
राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
कसबा बावडा : कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राहुल गांधीच्या हस्ते करण्यात आले.

कसबा बावडा
1/10

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राहुल गांधीच्या हस्ते करण्यात आले.
2/10

या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यानंतर ते कोल्हापूर येथील सयाजी हॉटेलमध्ये संविधान संमेलन घेणार आहेत.
3/10

या ठिकाणी ते बाराशे निमंत्रितांसोबत विचार मंथन करणार आहेत. राहुल गांधी संविधान संमेलनातून कोणती भूमिका घेत महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरे जाणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
4/10

राहुल गांधी शुक्रवारीच कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळा अनावरणासाठी येणार होते, परंतु यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कालचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला, त्यानंतर आज ते कोल्हापुरात दाखल झाले.
5/10

राहुल गांधी शुक्रवारीच कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळा अनावरणासाठी येणार होते, परंतु यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कालचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला,
6/10

त्यानंतर आज ते कोल्हापुरात दाखल झाले.
7/10

“आज आपण मूर्तीचं अनावरण करत आहोत. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.
8/10

हा केवळ एक पुतळा नाही. पुतळा जेव्हा बनवतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला, त्यांच्या कर्माला मनापासून समर्थन करतो.
9/10

आपण इथे आलो किंवा कुणी मूर्तीचं अनावरण केलं. शिवाजी महाराज ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर लढले, त्या गोष्टीसाठी आपण लढलो नाही तर पुतळा अनावरणाला काही अर्थ नाही.
10/10

जेव्हा पुतळ्याचं अनावरण करतो, तेव्हा शिवाजी महाराज जसं लढले, ज्या गोष्टींसाठी लढले तेवढं नाही, पण थोडं तरी काम आपण केलं नाही” असं राहुल गांधी म्हणाले.
Published at : 05 Oct 2024 01:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
