एक्स्प्लोर

भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?

राज्य सरकार स्थापन होण्याची उत्सुकता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही लागली असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनाच संधी मिळेल, असे दिसून येते.

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या असून महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची समजूत काढली जात आहे. त्यातच, भाजपचे केंद्रातील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे एकनाथ शिंदे यांनी गुरुवारीच जाहीर केलं आहे. तर, अजित पवारांनीही भाजपला आमचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा (Chief Minister) मार्ग मोकळा झाला असून आता उपमुख्यमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटातून कोणाची वर्णी लागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, भाजप मुख्यमंत्र्‍यांसह गृहंत्रीपद देखील स्वत:कडेच ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेकडे वजनदार कोणतं खातं राहिलं, याची देखील उत्सुकता शिवसेना आणि महाराष्ट्रातील आमदारांना आहे. दरम्यान, राज्याचं अर्थमंत्रीपद हे अजित पवारांकडेच राहिल, अशी सूत्रांची माहिती आहे. 

राज्य सरकार स्थापन होण्याची उत्सुकता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही लागली असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनाच संधी मिळेल, असे दिसून येते. तत्पूर्वी, महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात प्रत्येकी एक-एक मंत्रीपदही देण्यात येणार असल्याचे समजते. राज्यात महायुतीला 237 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपने 132 जागांसह मोठी आघाडी घेतली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाला 57 जागांवर विजय मिळाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदावर भाजपचा दावा असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजप नेते व आमदारांची इच्छा आहे. त्यामुळे, महायुतीमधील त्यांच्या घटक पक्षांकडे कोणती खाती जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात व राजकीय विश्लेषणातून समोर येत आहे. 

सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपला 21, त्यापाठोपाठ शिंदे गटाला 12 आणि अजितदादा गटाला 10 मंत्रीपदे मिळणार आहेत. मात्र, या सगळ्यात राज्यात वचक ठेवण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती कोणाकडे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदासह गृह खाते हे भाजपकडे राहणार आहे. तसेच सामान्य प्रशासन हेही अत्यंत महत्त्वाचे खाते मुख्यमंत्र्‍यांकडे म्हणजे भाजपकडे राहिल. तर, अर्थ खातं अजित पवारांना दिले जाणार असून नगरविकास खातं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असेल, अशी सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खातं दिलं जाईल. याबाबत आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सर्वांचे लक्ष आजच्या बैठकीतील निर्णयाकडे लागले आहे. दरम्यान, 2 डिसेंबर रोजी राज्य सरकार स्थापन होऊन मुख्यंत्रीपदाचा शपथविधी सोहळा होईल, अशी माहिती आहे. त्यामुळे, अधिकृतपणे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून किंवा भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर होत नाही, तोपर्यंत सर्वांचीच उत्कंठा ताणली आहे. 

हेही वाचा

वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला
Amol Mitkari On Ajit Pawar: पायलटला संमोहित करण्यात आले होते का? अजितदादांच्या अपघातावरुन मिटकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Laxman Hake : अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
सलमान खान सारखे संघाच्या व्यासपीठावर केवळ गर्दी जमवण्यासाठी होते की मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण? आज सत्ता आहे म्हणून, सत्ता जाईल तेव्हा हे लोक आपल्या व्यासपीठावर येतील का? संजय राऊतांचा खोचक सवाल
Embed widget