एक्स्प्लोर
RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes: 'सावकाश बदला दोन हजारांच्या नोटा', नक्की असं का म्हटलं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी?
RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes: दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes
1/8

दोन हजारांच्या नोट बंद झाल्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काळजी करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं म्हटलं आहे. तसेच तुम्ही आरामात या नोटा बदलू शकता असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
2/8

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं की, 'नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी दिला आहे त्यामुळे तुम्ही सावकाश नोट बदलू शकता.'
3/8

आरबीआयने म्हटलं की, 'दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे.'
4/8

नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळे हा चार महिन्यांचा कालावधी लोकांनी गांभीर्याने घ्यावा असं देखील दास म्हणाले आहेत.
5/8

शक्तिकांत दास यांनी म्हटले की, 'या नोटा बदलणे हे क्लिन नोट पॉलिसीचा भाग होता.'
6/8

आरबीआयचे गव्हर्नर दास यांच्या मते हा व्यवस्थापनाचा भाग आहे.
7/8

तसेच दास यांनी म्हटलं आहे की, 'नोटा बदलण्यासाठी बराच कालावधी दिला आहे, त्यामुळे यासाठी कोणतीही अफरा-तफर करु नये.'
8/8

तसेच कोणतीही अडचण आल्यास आरबीआय त्यावर उपाय काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असं आश्वासन देखील दास यांनी दिलं आहे.
Published at : 22 May 2023 01:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
क्रीडा
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion