एक्स्प्लोर
Operation Samudra Setu: नौदलाच्या मदतीने ऑक्सिजन आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा, नऊ युद्धनौकांचा आयातीसाठी वापर

Oxygen_import
1/8

देशातील ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौसेना विदेशातून ऑक्सिजन कंटेनर आणि ऑक्सिजन सिलेंडर्स आयात करत आहे. या ऑपरेशनला समुद्र सेतू असं नाव दिलं गेलं आहे.
2/8

ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत सोमवारी म्हणजेच 10 मे रोजी नौदलाच्या तीन युद्धनौका, लिक्विड ऑक्सिजन सिलेंडर्स, वैद्यकीय उपकरणे देशातील तीन मोठ्या बंदरांवर आणली गेली.
3/8

Photo Source – Twitter : @indiannavy
4/8

नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक माधवाल यांच्या माहितीनुसार, ऑपरेशन समुद्र-सेतू अंतर्गत तीन युद्धनौका कतार, कुवैत आणि सिंगापूर येथून 04 भरून 27 मेट्रिक टन क्षमतेचे लिक्विड ऑक्सिजन कंटेनर, आठ रिक्त ऑक्सिजन कंटेनर (क्षमता 20 एमटी), 900 ऑक्सिजन सिलेंडर 3150 रिकामी सिलेंडर्स आणि 10,000 रॅपिड अॅंटिजेन टेस्टिंग किट्ससह मोठ्या प्रमाणात इतर वैद्यकीय उपकरणे भारतात पोहोचली आहेत.
5/8

Photo Source – Twitter : @indiannavy
6/8

नौदलाच्या माहितीनुसार, आयएनएस ऐरावत युद्धनौका आज सकाळी सिंगापूरहून आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम बंदरावर आली. आठ रिक्त क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर, 3150 रिकामे सिलिंडर, 500 भरलेले सिलेंडर्स आणि 10,000 रॅपिड Antigen Testing किट होते.
7/8

याव्यतिरिक्त आयएनएस त्रिखंड देखील कतारहून 27 मेट्रिक टन भरलेल्या ऑक्सिजन कंटेनरसह फ्रान्सच्या मदतीने मुंबईला पोहोचला आहे.
8/8

यातील दोन युद्धनौके भारताच्या दोन वेगवेगळ्या बंदरांवर पोहोचली असून तिसरे संध्याकाळपर्यंत पोचले आहेत.
Published at : 10 May 2021 07:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
बीड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
