एक्स्प्लोर
New Parliament Building : आतून अशी दिसते संसदेची नवी इमारत, 28 मे रोजी होणार उद्धाटन, पाहा फोटो
New Parliament: सेट्रल व्हिस्टा प्रोजेक्टच्या इमारतीचं उद्धाटन 28 मे रोजी होणार असल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.

New Parliament
1/10

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्धाटनाचा मुहूर्त ठरला असून 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या इमारतीचं उद्धाटन होणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही माहिती दिली आहे.
2/10

संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील. लोकसभेचे एक हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे.
3/10

सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत, नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक असणार आहेत.
4/10

या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल.
5/10

याशिवाय या नव्या संसदेत 120 कार्यालयं, म्युझियम, गॅलरीही असणार आहे.
6/10

नवीन संसद भवनातील लोकसभेच्या तळाचा आराखडा राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर ठेवण्यात आला आहे. नवीन इमारत जुन्या संसद भवनापेक्षा 17,000 चौरस मीटर मोठी आहे.
7/10

ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे, तिचे डिझाइन 'HCP डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' ने तयार केले आहे. त्याचे शिल्पकार विमल पटेल आहेत.
8/10

एकूण 13 एकरावर नवीन इमारत बांधली गेली आहे. हे राष्ट्रपती भवनापासून हाकेच्या अंतरावर आहे.
9/10

सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या चार मजली नवीन संसद भवनात लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
10/10

नव्या संसदेच्या इमारतीचं कंत्राट टाटा प्रोजेक्ट्सला 2020 मध्ये 861.9 कोटी रुपयांना देण्यात आले होते. त्याची किंमत नंतर वाढवून सुमारे 1,200 कोटी रुपये करण्यात आली.
Published at : 18 May 2023 10:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
