एक्स्प्लोर
IRCTCचं साउथ इंडिया Tour पॅकेजमध्ये दक्षिण भारतात फिरण्याची मजा
IRCTC South India Tour Package : जर तुम्हाला प्रवासाची खूप आवड असेल, तर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय IRCTC आहे.

IRCTC South India Tour Package
1/12

आयआरसीटीसी नेहमी नवनवीन टूर पॅकेजेस लाँच करत असते आणि यामध्ये तुम्ही एकटे किंवा जोडीदार आणि कुटुंबासह जाऊनही खूप मजा करू शकता. (Image Source : istock)
2/12

तुम्ही नवीन वर्षात फिरण्याचा विचार करत असाल तर, IRCTC चं जानेवारीमध्ये खास टूर पॅकेज सुरु होत आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला दक्षिण भारतात फिरण्याची मजा घेता येणार आहे. (Image Source : istock)
3/12

या पॅकेजमध्ये तुम्ही एकाच वेळी अनेक ठिकाणांना भेट देऊ शकाल आणि तेही बजेटमध्ये. या टूर पॅकेजची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. जानेवारी व्यतिरिक्त मार्चमध्येही तुम्ही या पॅकेजचा लाभ घेऊ शकता. (Image Source : istock)
4/12

आयआरसीटीसीच्या या पॅकेजचं नाव साउथ इंडिया टूर (South India Tour) पॅकेज आहे. हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचं असून हे फ्लाइट पॅकेज आहे. (Image Source : istock)
5/12

साउथ इंडिया टूर पॅकेजमध्ये तुम्हाला कन्याकुमारी, कोवलम, मदुराई, रामेश्वरम आणि त्रिवेंद्रम येथे फिरण्याची संधी मिळेल. (Image Source : istock)
6/12

या पॅकेजमध्ये तुम्हाला ये-जा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी विमान सुविधा उपलब्ध असेल. राहण्यासाठी 3 स्टार हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल. (Image Source : istock)
7/12

या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल. प्रवासासाठी एसी बसची सुविधा असेल. या टूर पॅकेजमध्ये प्रवास विमा देखील संरक्षित केला जाईल. (Image Source : istock)
8/12

या टूरमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 51,000 रुपये द्यावे लागतील. (Image Source : istock)
9/12

दोन जण प्रवास करणार असाल तर, प्रति व्यक्ती 39,600 रुपये मोजावे लागतील. (Image Source : istock)
10/12

तीन लोकांसाठी हे पॅकेज घेत असाल, तर प्रति व्यक्ती 38,000 रुपये फी भरावी लागेल. (Image Source : istock)
11/12

तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल. (Image Source : istock)
12/12

5-11 वर्षाच्या मुलांच्या बेडसाठी तुम्हाला 33,600 रुपये द्यावे लागतील आणि तर याशिवाय तुम्हाला 29,300 रुपये द्यावे लागतील. (Image Source : istock)
Published at : 21 Nov 2023 02:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
