एक्स्प्लोर
Maratha Reservation : "आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या...."; औरंगाबाद शहरात कडकडीत बंद
Maratha Reservation : औरंगाबाद जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आली असून, सर्वत्र याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय.

closed in Aurangabad city
1/9

जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
2/9

औरंगाबाद बंदला शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत असून, महत्वाच्या बाजारपेठ बंद आहेत.
3/9

शहरातील आकाशवाणी ते क्रांती चौक, पैठण गेट, गुलगुंडी सर्व ठिकाणी पूर्णपणे बंद पाहायला मिळत आहे.
4/9

औरंगाबाद शहरातील सर्वच मुख्य बाजारपेठा बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
5/9

आज सकाळपासूनचं शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून, सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
6/9

शहरातील गुलमंडी, निराला बाजार, मोंढा, पैठण गेट, सिटी चौक, खडकेश्वरसह अनेक भागात दुकाने बंद असल्याचे दिसून येत आहेत.
7/9

तसेच सिडको-हडको परिसरात देखील पूर्णपणे बंद असल्याचे चित्र असून, व्यापाऱ्यांनी बंदला पाठींबा दिला आहे.
8/9

तर काही भागात तरुणांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. तसेच दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
9/9

दरम्यान शहरातील नेहमी वर्दळीचे ठिकाण आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
Published at : 04 Sep 2023 01:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
