एक्स्प्लोर
Heart Failure : हार्ट फेल्युअरचा धोका टाळायचा असेल, तर लगेच या सवयींचा अवलंब करा!
काही वाईट सवयी सोडून काही चांगल्या सवयीचा अवलंब केल्यास हृदयरोग आणि हार्ट फेल्युअरचा धोका बऱ्याच अंशी टाळता येतो.

Heart Failure (Photo Credit : Pexel)
1/9

आजकाल लोक लहान वयातच हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. भारतात गेल्या काही वर्षांपासून हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. (Photo Credit : pexels )
2/9

काही वाईट सवयी सोडून काही चांगल्या सवयीचा अवलंब केल्यास हृदयरोग आणि हार्ट फेल्युअरचा धोका बऱ्याच अंशी टाळता येतो. (Photo Credit : pexels )
3/9

हार्ट फेल्युअरचा धोका टाळायचा असेल तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला शारीरिकरित्या ॲक्टिव्ह ठेवणं. चालणे, दोरी उड्या मारणे, जॉगिंग, सायकलिंग किंवा योगाद्वारे शरीर गुंतवून ठेवा. जर तुम्ही कोणत्याही आजारामुळे अशा शारीरिक क्रिया करू शकत नसाल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला, ते तुम्हाला तुमच्या स्थितीनुसार योग्य व्यायाम सुचवू शकतात. (Photo Credit : pexels )
4/9

हार्ट फेल्युअर टाळण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपल्या आहारात फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, शेंगदाणे, डाळींचे प्रमाण वाढवा. सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, कोलेस्टेरॉल, सोडियम, रेड मीट, गोड पदार्थ आहारातून वगळा. मिठाचे प्रमाणही कमी करा(Photo Credit : pexels )
5/9

हार्ट फेल्युअरचा धोका टाळण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणंही खूप गरजेचं आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि धमनी अडथळा यासारख्या समस्या उद्भवू शकतात आणि हृदयावर परिणाम होतो. आहारात आवश्यक ते बदल करून आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहून वजन सहज नियंत्रणात ठेवता येते.(Photo Credit : pexels )
6/9

तणावामुळे एकाच वेळी अनेक समस्या उद्भवू शकतात. तणावामुळे झोपेत व्यत्यय येतो आणि झोपेचा परिणाम आपल्या मनःस्थितीवर, पचनावर आणि हृदयावर होतो. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. (Photo Credit : pexels )
7/9

मेडिटेशन केल्याने तुम्हाला तणावदूर होण्यास बऱ्याच अंशी मदत होते. दररोज १५ ते २० मिनिटे एकांतात घालवा आणि ध्यान करा. जास्त राग आला तर १०० पर्यंत अंक मोजा. हा उपाय अतिशय परिणामकारक आहे.(Photo Credit : pexels )
8/9

धूम्रपान केल्याने हृदयअपयशाचा धोका वाढू शकतो. तंबाखूच्या धुरातून मिळणारे निकोटीन हृदयगती आणि रक्तदाब वाढविण्याचे काम करते. धूम्रपान केल्याने हृदयात रक्त पोहोचविणार्या रक्तवाहिन्यांमध्ये चिकटपणा येऊ शकतो आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. (Photo Credit : pexels )
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
Published at : 31 Jan 2024 12:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
बातम्या
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
