एक्स्प्लोर
Shah Rukh Khan : 'या' नावडत्या बॉडी पार्टमुळे शाहरुख खानचं नशीब चमकलं, असा मिळाला बॉलिवूडमधील पहिला चित्रपट
Bollywood Kissa : बॉलिवूडचा 'किंग' अभिनेता शाहरुख खान याने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा यशस्वी प्रवास केला आहे.

How Shah Rukh Khan Got First Film
1/12

टीव्हीमध्ये काम केल्यानंतर शाहरुख खान बॉलिवूडमध्ये आला. पण त्याला पहिला चित्रपट त्याच्या अभिनयामुळे नाही तर शरीराच्या एका अवयवामुळे मिळाला.
2/12

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या अभिनयाचे देश-विदेशात लाखो चाहते आहेत. शाहरुख खान 30 वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे.
3/12

शाहरुख खानने जगभरात विशेष नाव कमावलं आहे. पण शाहरुखला पहिला चित्रपट त्याच्या टॅलेंटमुळे नाही तर शरीराच्या एका भागामुळे मिळाला. खुद्द शाहरुखने एका मुलाखतीत हा खुलासा केला.
4/12

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी शाहरुख खानने छोट्या पडद्यावर काम केलं होतं. 'फौजी' या टीव्ही शोमधून त्याला प्रसिद्धी मिळाली.
5/12

छोट्या पडद्यानंतर शाहरुख मोठ्या पडद्याकडे वळला. 'दीवाना' चित्रपटातून शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं.
6/12

1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दीवाना' चित्रपटात त्याने दिव्या भारती आणि ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलं होतं.
7/12

'दीवाना' हा शाहरुख खानचा रिलीज झालेला पहिला चित्रपट असला तरी त्याला ऑफर झालेला पहिला चित्रपट 'दिल आशना है' होता. हा चित्रपट दिवाना चित्रपटानंतर काही महिन्यांनी प्रदर्शित झाला होता.
8/12

'दिल आशना है' चित्रपटाचं दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केलं होतं. या चित्रपटात शाहरुखने सहाय्यक अभिनेता म्हणून काम केलं होतं. मिथुन चक्रवर्ती, जितेंद्र, अमृता सिंह आणि डिंपल कपाडिया यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
9/12

शाहरुख खानने एका मुलाखतीदरम्यान खुलासा करताना सांगितलं होतं की, त्याला 'दिल आशना है' चित्रपट त्याच्या नाकामुळे मिळाला होता.
10/12

हेमा मालिनी त्याला म्हणाल्या होत्या, 'तुझं नाक सर्वांपेक्षा खूप वेगळं आहे आणि याच नाकामुळे तुला ही संधी मिळाली आहे.
11/12

शाहरुख खानला त्याच्या नाकामुळे चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, पण त्याला त्याचं नाक कधीच आवडलं नाही.
12/12

शाहरुख खानला वाटायचं की त्याचं नाक मोठं आहे, यामुळे त्याला त्याचं नाक आवडायचं नाही. पण या बॉडी पार्टमुळे शाहरुखचं नशीब चमकलं आणि त्याला हेमा मालिनी यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
Published at : 10 Sep 2024 01:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
नाशिक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
