एक्स्प्लोर
Advertisement

अभिनेत्री कतरिना कैफ देणार गूड न्यूज? प्रेंग्नेंट असल्याची सोशल मीडियावर चर्चा
Katrina Kaif Latest Pics : अभिनेत्री कतरिना कैफ प्रेंग्नेंट असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

Katrina Kaif Pregnancy rumors
1/9

या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी गूड न्यूज दिली. वर्षाच्या सुरुवातीला अनुष्का शर्माने मुलगा अकायला जन्म दिला. अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या घरी मुलीचं आगमन झालं आहे. तर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरीही लवकरच पाळणा हलणार आहे. त्यातच आता कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2/9

अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या लेटेस्ट ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीचा नो मेकअप लूक दिसत आहे.
3/9

या फोटोंमध्ये कतरिना कैफ तिच्या हॉटेल रूमच्या बाल्कनीजवळ बसून सेल्फी काढताना दिसत असून तिच्या मागे दऱ्यां-खोऱ्यांचं सुंदर दृश्य दिसत आहे.
4/9

अलीकडेच कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनी पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
5/9

सध्या कतरिना कैफ मेडिकल हेल्थ रिसॉर्टमध्ये आपला निवांत वेळ घालवत आहे. तिने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत तिच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
6/9

एका फोटोमध्ये कतरिना कैफने पांढरा टॉप परिधान केला आहे. या फोटोमध्ये तिची गोड स्माईल आणि नो मेकअप लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
7/9

निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या रिसॉर्टमध्ये कतरिना खूप आनंदी असल्याचं तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत आहे. तिने फोटो शेअर करताना मेडिकल हेल्थ रिसॉर्टचे आभार मानले आहेत.
8/9

याआधी कतरिना कैफ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात स्पॉट झाली होती. तिचा ट्रेडिशन लूक पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
9/9

अनंत-राधिकाच्या लग्नात कतरिना कैफ पती अभिनेता विकी कौशलसोबत पोहचली होती. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले होते.अभिनेत्री कतरिना कैफ गेल्या वर्षी अभिनेता विजय सेतुपतीसोबत 'मेरी ख्रिसमस' चित्रपटामध्ये दिसली होती.
Published at : 25 Jul 2024 11:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
