Ramdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव-भीमा स्मारकासाठी 200 एकर जमीन मिळावी
Ramdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव-भीमा स्मारकासाठी 200 एकर जमीन मिळावी
पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये आज २०७व्या शौैर्यदिनानिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतोय. विजय स्तंभाला यंदा संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट करण्यात आलीय. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी कोरेगाव-भिमा विजयस्तंभाला अभिवादन केलंय. दरम्यान याठिकाणी ५ हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
यावर्षी कोरेगाव भीमा सभेसाठी पाच हजार पोलीस कर्मचारी,सातशे पन्नास पोलिस आधिकारी तैनात असणार आहेत. यासोबतच एक हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करणार. याशिवाय, येथील परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी 50 पोलिस टॉवर , 10 ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस रथक असेल अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी शांतता राखण्यासाठी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची दंगल होऊ नये यासाठी सोशल मिडीयावर निर्बंध असणार असतील. काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
पार्किंगसाठी सोय
कोणालाही अडचण होणार नाही यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्यात 45 पार्किंग सेंटर आहेत. 30 हजार चारचाकी आणि ३० दुचाकी क्षमता असलेले सेंटर आहेत.
वाहतूक मार्गात कोणते बदल होणार?
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त सभेचे नियोजन करण्यात आले असून वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. तरी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.