एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजित पवारांची आई विठुरायाच्या दर्शनाला, दानपेटीत 500 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल टाकतानाच व्हिडीओ व्हायरल

pandharpur vitthal mandir: नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपूरच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे. अजित पवारांच्या आईनेही बुधवारी विठुरायाचे दर्शन घेतले.

सोलापूर: आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या श्रीमती आशाताई पवार यांनी देवाच्या समोरील दानपेटीत आपल्या सोबत आणलेले गुप्त दान अर्पण केले. विठुरायाचे दर्शन झाल्यावर श्रीमती आशाताई यांनी आपल्या सोबतच्या लाल पिशवीत जपून आणलेले गुप्तदान स्वतःच्या हाताने देवाच्या हुंडी पेटीत अर्पण केले. सोबत आणलेली रोकड एकावेळी टाकता येत नसल्याने दोन वेळा आशाताईंनी ही रक्कम देवाच्या हुंडी पेटीत अर्पण केली. नोटांचे बंडल जाड असल्याने ते हुंडीत जात नव्हते. अखेर पाचशेच्या नोटांचं हे बंडल आशाताई पवार यांनी ढकलून हुंडीच्या आतमध्ये टाकले. आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी आशाताई या विठ्ठल दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी पवार कुटुंबातील वाद लवकर संपू देत आणि अजित दादांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ देत असे साकडेही आशाताई पवार यांनी विठुरायाला घातले. अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना पराभव केला होता. 

आज नववर्षाचा पहिला दिवस असल्याने राज्यभरातील प्रमुख देवळांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. पंढरपुरात हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झालेले असताना मंदिर समितीने विठ्ठल मंदिराला जवळपास 5000 संत्र्यांची आकर्षक सजावट केलेली आहे.  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आळंदी येथील भाविक प्रदीप सिंह ठाकुर यांनी विठ्ठलाचरणी संत्री आणि फुलांची आकर्षक सजावट केली आहे. त्यामुळे मंदिरामध्ये नववर्षाच्या स्वागताचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

दरम्यान, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे दिसून आलेले नाहीत. संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आले आहेत. अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. मात्र, यानंतर अजित पवार याप्रकरणावर फारसे बोलताना किंवा धनंजय मुंडे यांचा बचाव करताना दिसून आले नव्हते. त्यामुळे अजित पवार नक्की कुठे गायब आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार हे नववर्षानिमित्त सध्या परदेशात फिरायला गेले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये ते राज्यात परतणार आहेत. यानंतर ते पुन्हा सक्रिय होतील. 

आणखी वाचा

कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांना 'राखे'तून भरारी कशी घेतली?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
BMC Election 2026: मोठी बातमी : नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले, God is Great!
मोठी बातमी : नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले, God is Great!
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
Embed widget