Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
Accident : सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळामध्ये आयशर ट्रकला बीडकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या स्काॅर्पिओने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
Accident : जालना जिल्ह्यामधील सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळामध्ये उभ्या असलेल्या आयशर ट्रकला मागून स्काॅर्पिओ कार धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघेजण जागीच ठार झाले. दोघेजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळामध्ये आयशर ट्रकला बीडकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. दरम्यान, घटनास्थळी जालन्यातील गोंदी पोलीस दाखल झाले. या अपघातात जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
स्कोर्पिओ आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात 4 भाविक जागीच ठार
दरम्यान, स्कोर्पिओ आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात अक्कलकोट तालुक्यातील 4 भाविक जागीच ठार झाले, तर 7 जण जखमी झाले. नवीन वर्षानिमित्त देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर वाटेतच काळाचा घाला पडला आहे. अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गणगापूरकडे निघाले असताना भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे अपघात झाला. आज सकाळी 7 च्या सुमारास झालेल्या अपघातात 2 महिला आणि 2 पुरुष जागीच ठार झाले. सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले. जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात करण्यात आले आहे.
PSI चा अपघाती मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना
दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एका अपघातामुळे (Accident) हळहळ व्यक्त होत आहे. पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावर असतानाच अपघाती (Accident) मृत्यू झाला. जितेंद्र गिरनार असं त्यांचं नाव असून ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून पीएसआय गिरनार हे चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरुन ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता, मात्र, कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पीएसआय गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली. या घटनेमध्ये गिरनार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जाती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या