एक्स्प्लोर
Shani Amavasya 2023 : आज शनि अमावस्येनिमित्त जाणून घ्या शनिशिंगणापूरचं महत्त्व आणि आख्यायिका
Shani Amavasya 2023 : आज 22 जानेवारी रोजी शनि अमावस्या आहे. हा दिवस शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) मंदिरात भगवान शनिदेवाची उपासना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो.

Shani Shingnapur Shani Amavasya 2023
1/10

पंचांगानुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी शनिवार, 21 जानेवारी 2023 रोजी आहे. ही अमावस्या शनिवारी असल्यामुळे याला शनि अमावस्या असं म्हणतात.
2/10

आजचा म्हणजे शनि अमावस्येचा दिवस शनिशिंगणापूर मंदिरात भगवान शनिदेवाची उपासना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो.
3/10

आज देशभरातील असंख्य भाविक या दिवशी शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी शनिशिंगणापूरमध्ये येतात. या दिवशी शनि देवाची भव्य जत्रा आणि मिरवणूक काढली जाते.
4/10

भारताच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूरची ओळख आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले.
5/10

अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनीदेव स्वयंभू पाषाण रुपात विराजमान आहेत.
6/10

येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती 5 फूट 9 इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते.
7/10

सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन 'मामा-भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा', असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करुन तिची पूजा करण्यास प्रारंभ केला.
8/10

विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे.
9/10

एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे. मूर्तीच्या डोक्यावर वृक्ष पण नाही. शनिदेवाला निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही.
10/10

वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते. शनिदेवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.
Published at : 21 Jan 2023 10:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
