एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2024 : पाऊले चालती पंढरीची वाट! संत गजानन महाराजांच्या पालखीचं उद्या शेगावातून प्रस्थान, गण गण गणात बोतेच्या गजरात सोहळा रंगणार
Buldhana : सर्वांनाच आता आषाढी वारीची आस लागला आहे. संत गजानन महाराजांची पालखी उद्या शेगावातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे, याचा जल्लोष आजपासूनच शेगावात सुरू झाला आहे.

Buldhana Shegaon Sanint Gajanan Maharaj Palkhi
1/10

सालाबादप्रमाणे या वर्षीही आषाढी वारीचा उत्साह पाहायला मिळत आहे. उद्या शेगाव येथून संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल, याचा जल्लोष आजपासूनच शेगावात पाहायला मिळत आहे.
2/10

संत गजानन महाराजांची पालखी 15 जुलैला पंढरपूर येथे पोहोचेल.
3/10

दरवर्षी आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूर येथे जात असते.
4/10

यंदाही पालखीचं शेगाव येथून पंढरपूर साठी प्रस्थान होणार आहे.
5/10

पालखी प्रस्थानाची तयारी संत गजानन महाराज संस्थानाने पूर्ण केली असून यंदा दिंडीचे हे 55वं वर्ष आहे.
6/10

जवळपास 700 वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं उद्या प्रस्थान होणार आहे. या दिंडीत 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी उद्या सकाळी मंदिरातून प्रस्थान होणार आहे.
7/10

तर पुढील 1 महिना 2 दिवस पायी प्रवास करून 15 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
8/10

पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहेत. आषाढी सोहळा संपल्यावर पालखी 21 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघून 11 ऑगस्ट रोजी शेगावात पोहोचेल.
9/10

उद्या या पालखी प्रस्थान सोहळ्याला नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे उपस्थित राहणार आहे.
10/10

गण गण गणात बोतेच्या गजरात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा रंगणार आहे.
Published at : 12 Jun 2024 01:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion