पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Rain) तोंडचा घास हिरावला आहे.
2/9
जिल्ह्यातील 28 आणि 29 नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील कापूस (cotton), तूर या पिकांना जोरदार फटका बसला.
3/9
ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे पुन्हा वेचणीला आलेला कापूस ओला झाल्यानं झाडावरच काळा पडत आहे.
4/9
हिरवेगार कापसाचे झाडाचे बोंड झाडावरच वाळत चालले आहे. त्यामुळे कापसाची प्रत घसरत चालली आहे.
5/9
हवामानामुळं कापसाची प्रत घसरली आहे. त्यामुळं बाजारात सात ते साडेसात हजार रुपये क्विंटल दराचा कापूस आता व्यापारी 6 हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करीत आहे.
6/9
एकीकडे निसर्ग शेतकऱ्यांना रडवत आहे तर दुसरीकडे व्यापारी विक्रीसाठी नेलेला कापूस कमी दरात खरेदी करून रडवत असल्याचे चित्र आहे.
7/9
कापसाला किमान 10 हजार रुपयांचा दर मिळावा ही मागणी
8/9
काही भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कपाशीचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वेचणी करण्यात आली
9/9
कापसाला किमान दहा हजार क्विंटल तरी भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.