Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूंना फक्त व्हाईट ब्लेझर का दिलं जातं? काय आहे नेमका इतिहास??
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेत्या संघाला पांढरा ब्लेझर का घालायला लावला जातो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पहिली ICC चॅम्पियन्स ट्रॉफी1998 मध्ये बांग्लादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती.

Champions Trophy : फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचे हे सातवे आयसीसी विजेतेपद आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दोन वनडे आणि दोन टी-20 विश्वचषकानंतर तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बक्षीस समारंभात संपूर्ण टीम खास व्हाईट ब्लेझरमध्ये परिधान केली होती. आयसीसीच्या इतर कोणत्याही स्पर्धेत पांढऱ्या ब्लेझरची परंपरा नाही.
Iyer - 243 runs
— Johns. (@CricCrazyJohns) March 10, 2025
Kohli - 218 runs
Gill - 188 runs
Rohit - 180 runs
Rahul - 140 runs
Axar - 109 runs + 5 wickets
Hardik - 99 runs + 4 wickets
Jadeja - 27 runs + 5 wickets
Shami - 9 wickets
Varun - 9 wickets
Kuldeep - 7 wickets
Harshit - 4 wickets
A TOTAL TEAM EFFORT 🇮🇳🏆 pic.twitter.com/DoDDGDLcRB
विजेत्या संघाला पांढरा ब्लेझर का घालायला लावला जातो?
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेत्या संघाला पांढरा ब्लेझर का घालायला लावला जातो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पहिली ICC चॅम्पियन्स ट्रॉफी1998 मध्ये बांग्लादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. परंतु, केवळ 2009 च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत आयकॉनिक पांढरा ब्लेझर सादर करण्यात आला होता, जो विजयी संघाच्या प्रत्येक सदस्याने आदराचे चिन्ह म्हणून परिधान केला होता. 13 ऑगस्ट 2009 रोजी अनावरण केलेले हे जॅकेट प्रथम मुंबईस्थित फॅशन डिझायनर बबिता एम यांनी तयार केले होते. ज्यांचे कलेक्शन अनेक हाय-प्रोफाइल आउटलेटमध्ये विकले गेले. जॅकेटमध्ये उच्च दर्जाचे इटालियन लोकर आहे.
The iconic #ChampionsTrophy White Jackets look good on India 🤩
— ICC (@ICC) March 9, 2025
More 👉 https://t.co/SGA6TKUuGX pic.twitter.com/oyZ6CcKO35
पांढरा रंग शुद्धता स्वच्छता आणि विजयाचे प्रतीक
पांढऱ्या रंगाच्या जॅकेटवर सोन्याची वेणी आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगो कापडावर सोनेरी बाह्यरेखा असलेली नक्षी आहे. पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी औपचारिक सूटचे अनावरण केले होते. आयोजकांच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये, त्यांनी हे अधोरेखित केले की जॅकेट हे वारशाचे प्रतीक आहे जे येणाऱ्या पिढीला प्रेरणा देते. पांढरा रंग शुद्धता स्वच्छता आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. विजेत्यांची कामगिरी विशेष बनविण्यासाठी आयोजकांनी हा रंग निवडला.
CHAMPIONS 🇮🇳🇮🇳#TeamIndia pic.twitter.com/5fjltfyBB6
— BCCI (@BCCI) March 9, 2025
कर्णधार रोहित शर्माच्या (76 धावा) अर्धशतकाच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली. अंतिम सामन्यात 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 49 षटकात 6 विकेट गमावत 254 धावा करत विजय मिळवला. श्रेयस अय्यरने 48 आणि शुभमन गिलने 31 धावा केल्या. अक्षर पटेलने 29 धावांचे योगदान दिले. केएल राहुलने नाबाद 34 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 9 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंडने डॅरिल मिशेल (63 धावा) आणि मायकेल ब्रेसवेल (नाबाद 53) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सात विकेट्सवर 251 धावा केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या























