(Source: Poll of Polls)
Titanic Submarine: टायटॅनिक जहाजात माणसांसोबत होते 12 कुत्रे; जाणून घ्या त्यांचं काय झालं?
Titanic: टायटॅनिक जहाज हे 19 व्या शतकातील जहाज होतं, जे कधीही समुद्रात बुडणार नाही असं म्हटलं जात होतं. या जहाजाची उंची 17 मजली इमारतीएवढी असल्याचं सांगितलं जातं.
Titanic: 10 एप्रिल 1912 ही इतिहासातील ती तारीख आहे, जेव्हा टायटॅनिक जहाजातील (Titanic) 1 हजार 513 जणांनी आपला जीव गमावला. याच दिवशी 19 व्या शतकातील सर्वात मोठे जहाज ब्रिटनच्या साउथॅम्प्टन बंदरातून न्यूयॉर्कला निघाले होते. मात्र, हे जहाज त्याच्या ठरलेल्या स्थानी पोहोचण्यापूर्वीच अपघाताचा बळी ठरले आणि जहाजावरील हजारो लोकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या जहाजात माणसांसोबत त्यांचे पाळीव कुत्रे देखील होते. मिळालेल्या माहितीनुसार, टायटॅनिक जहाज बुडाले त्यावेळी त्यात 12 कुत्र्यांचा देखील समावेश होता. ज्यातील नऊ कुत्र्यांनी अपघातात आपला जीव गमावला तर तीन कुत्र्यांचा जीव वाचला.
कोणती तीन कुत्रे बचावले गेले?
अमेरिकन केनेल क्लबच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या अपघातात जहाजावर असलेल्या 12 कुत्र्यांपैकी तीन कुत्र्यांचे प्राण वाचले. यातील दोन कुत्रे पामेरेनियन जातीचे होते, तर एक कुत्रा पेकिंगिज जातीचा होता. पहिल्या पामेरेनियन कुत्र्याला मार्गारेट बेचस्टीन हेस (Margaret Bechstein Hays) यांनी पॅरिसहून खरेदी केलं होतं. दुसरा पोमेरेनियन कुत्रा हा मार्टिन आणि एलिझाबेथ जेन रॉथस्चाइल्ड (Martin and Elizabeth Jane Rothschild) यांचा होता. तिसरा पेकिंगिज जातीचा वाचलेला कुत्रा हा मायरा आणि हेन्री एस. हार्पर (Myra and Henry S. Harper) यांचा होता.
कसं होतं टायटॅनिक जहाज?
वॉशिंग्टन पोस्टच्या एका वृत्तानुसार, टायटॅनिक जहाज हे 19 व्या शतकातील असं जहाज होतं, जे कधीच पाण्यात बुडणार नाही, असं सांगितलं जायचं. या जहाजाची उंची 17 मजली इमारतीएवढी असल्याचं सांगितलं जातं. या जहाजाला चालवण्यासाठी दर दिवशी 800 टन कोळशाचा वापर व्हायचा. असं म्हटलं जातं की टायटॅनिकमध्ये 3 फुटबॉल मैदानांएवढी जागा होती आणि या जहाजाचे हॉर्न इतके जोरात वाजायचे की 11 मैल अंतरावरूनही त्याचा आवाज ऐकू येत होता.
अवशेष अजून बाहेर का नाही काढले?
टायटॅनिकचा मलबा समुद्रात वेगाने विरघळत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 20 ते 30 वर्षांपर्यंत टायटॅनिकचा मलबा पूर्णपणे पाण्यात विरघळून जाईल आणि समुद्राच्या पाण्यात एकजीव होईल. समुद्रात आढळणारे जीवाणू टायटॅनिकचे लोह वेगाने खात आहेत. हे समुद्री जीवाणू दररोज सुमारे 180 किलो कचरा खातात. टायटॅनिकचे उरलेले अवशेष बाहेर काढणं हे खूप धोकादायक आणि खर्चिक काम आहे. समुद्रात जहाजाचे अवशेष इतके सडले आहे की ते बाहेर काढल्यावर फक्त त्याचे गंजलेले लोखंडी तुकडे सापडतील.
हेही वाचा:
Titanic : 27 वर्षांपूर्वीच सापडले टायटॅनिकचे अवशेष, अजूनही समुद्र तळाशीच का? 'हे' आहे कारण