एक्स्प्लोर
Titanic : 27 वर्षांपूर्वीच सापडले टायटॅनिकचे अवशेष, अजूनही समुद्र तळाशीच का? 'हे' आहे कारण
Titan Submarine : जगातील सर्वात लोकप्रिय जहाजाच्या अपघाताला 100 हून अधिक वर्ष उलटून गेली आहे. या जहाजाचे अवशेष आजही अटलांटिक समुद्राच्या तळाशी आहेत.
![Titan Submarine : जगातील सर्वात लोकप्रिय जहाजाच्या अपघाताला 100 हून अधिक वर्ष उलटून गेली आहे. या जहाजाचे अवशेष आजही अटलांटिक समुद्राच्या तळाशी आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/5ffca00a852bb810075dc4fd6b1df5f71687186498548653_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Missing Titan Submarine | Titanic Facts
1/9
![टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीचा अपघात होऊन त्यातील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांजवळच या बेपत्ता असलेल्या टायटन पाणबुडीचे अवशेष सापडल्याची माहिती समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/5b746187eeec5ea75b74430142d3baa4455cf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीचा अपघात होऊन त्यातील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांजवळच या बेपत्ता असलेल्या टायटन पाणबुडीचे अवशेष सापडल्याची माहिती समोर आली आहे.
2/9
![15 एप्रिल 1912 साली टायटॅनिक जहाज हिमनगाला आदळून अटलांटिक महासागरात बुडालं. यामध्ये हजारो प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या जहाजाचे दोन तुकडे झाले, जे सुमारे 4000 खोल समुद्राच्या तळाशी गेले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/ce58ad869b21e206492a28d4cd98be3a3e5aa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
15 एप्रिल 1912 साली टायटॅनिक जहाज हिमनगाला आदळून अटलांटिक महासागरात बुडालं. यामध्ये हजारो प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या जहाजाचे दोन तुकडे झाले, जे सुमारे 4000 खोल समुद्राच्या तळाशी गेले.
3/9
![जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय जहाज टायटॅनिक बुडून 110 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्याचे अवशेष 1985 मध्ये सापडले होते. या जहाजाचे अवशेष सापडले असताना ते आजपर्यंत समुद्राबाहेर का काढले गेलेले नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/f906b1aa8cd158068e42d817024429d581788.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय जहाज टायटॅनिक बुडून 110 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्याचे अवशेष 1985 मध्ये सापडले होते. या जहाजाचे अवशेष सापडले असताना ते आजपर्यंत समुद्राबाहेर का काढले गेलेले नाहीत.
4/9
![टायटॅनिक जहाजने 10 एप्रिल 1912 रोजी ब्रिटनमधील साउथॅम्प्टन बंदरातून न्यूयॉर्कपर्यंतचा पहिला प्रवास सुरू केला. अवघ्या 4 दिवसांनंतर म्हणजेच 15 एप्रिल रोजी उत्तर अटलांटिक महासागरातील एका हिमनगाशी टक्कर होऊन या जहाजाचा अपघात झाला. या जोरदार धडकेत जहाजाचे दोन तुकडे झाले आणि जे सुमारे 4 किलोमीटर खोलीवर समुद्रात बुडाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/0bea8616672eb666b526eb214a294187473c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टायटॅनिक जहाजने 10 एप्रिल 1912 रोजी ब्रिटनमधील साउथॅम्प्टन बंदरातून न्यूयॉर्कपर्यंतचा पहिला प्रवास सुरू केला. अवघ्या 4 दिवसांनंतर म्हणजेच 15 एप्रिल रोजी उत्तर अटलांटिक महासागरातील एका हिमनगाशी टक्कर होऊन या जहाजाचा अपघात झाला. या जोरदार धडकेत जहाजाचे दोन तुकडे झाले आणि जे सुमारे 4 किलोमीटर खोलीवर समुद्रात बुडाले.
5/9
![टायटॅनिक जहाज दुर्घटनेत हजारो जणांना जीव गमवावा लागला. जहाजावरील प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांसह सुमारे 1500 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. टायटॅनिक जहाज दुर्घटना इतिहासातील सर्वात मोठी सागरी दुर्घटना आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/da7ea42f678b8bfb2275713d28199070bad67.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टायटॅनिक जहाज दुर्घटनेत हजारो जणांना जीव गमवावा लागला. जहाजावरील प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांसह सुमारे 1500 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. टायटॅनिक जहाज दुर्घटना इतिहासातील सर्वात मोठी सागरी दुर्घटना आहे.
6/9
![सुमारे जवळजवळ 70 वर्षे, टायटॅनिकचे अवशेष समुद्राच्या 4 किमी खाली होते. 1985 साली रॉब बॅलाड आणि त्यांच्या टीमने पहिल्यांदा समुद्राच्या तळाशी टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/84338374a05540b61aebc93aad2cc6ce5df6e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुमारे जवळजवळ 70 वर्षे, टायटॅनिकचे अवशेष समुद्राच्या 4 किमी खाली होते. 1985 साली रॉब बॅलाड आणि त्यांच्या टीमने पहिल्यांदा समुद्राच्या तळाशी टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधले.
7/9
![टायटॅनिक जहाजाचे अवशेष बाहेर काढण्याचं काम फार अवघड आहे. सुमारे 4 किलोमीटर खोलीवर समुद्रात हे जहाजाचे अवशेष आहेत. हे जहाज जिथे बुडाले तिथे सगळीकडे फक्त अंधारच. समुद्राच्या खोलीतील तापमानही 1 अंश सेल्सिअस असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/5c8ea410d61324f5637273ef84e12410e37b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टायटॅनिक जहाजाचे अवशेष बाहेर काढण्याचं काम फार अवघड आहे. सुमारे 4 किलोमीटर खोलीवर समुद्रात हे जहाजाचे अवशेष आहेत. हे जहाज जिथे बुडाले तिथे सगळीकडे फक्त अंधारच. समुद्राच्या खोलीतील तापमानही 1 अंश सेल्सिअस असते.
8/9
![या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना, एखाद्या व्यक्तीने इतके खोलवर जाणं आणि नंतर परत येणं हे खूप धोकादायक आहे. अशा परिस्थितीत खोल समुद्रातून ढिगारा बाहेर काढणं खूप कठीण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/c167d3f0c2c2ca5f9f015a57caf375fea2f7a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना, एखाद्या व्यक्तीने इतके खोलवर जाणं आणि नंतर परत येणं हे खूप धोकादायक आहे. अशा परिस्थितीत खोल समुद्रातून ढिगारा बाहेर काढणं खूप कठीण आहे.
9/9
![तज्ज्ञांच्या मते, टायटॅनिकचे अवशेष आता समुद्रात वेगाने नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना बाहेर काढूनही उपयोग होणार नाही. येत्या 20 ते 30 वर्षात टायटॅनिकचा अवशेष पूर्णपणे वितळून समुद्राच्या पाण्यात विरघळेतील, असं म्हटलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/3bd77bb8c71fc9eb2ddc28501f023f54a7d2b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तज्ज्ञांच्या मते, टायटॅनिकचे अवशेष आता समुद्रात वेगाने नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना बाहेर काढूनही उपयोग होणार नाही. येत्या 20 ते 30 वर्षात टायटॅनिकचा अवशेष पूर्णपणे वितळून समुद्राच्या पाण्यात विरघळेतील, असं म्हटलं जातं.
Published at : 23 Jun 2023 01:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)