एक्स्प्लोर
मेदांता हॉस्पिटलच्या एअर अॅम्ब्युलन्सचा बँकॉकमध्ये अपघात

नवी दिल्ली : मेदांता हॉस्पिटलच्या एअर अॅम्ब्युलन्सचा बँकॉकमध्ये अपघात झाला आहे. या एअर अॅम्ब्युलन्समध्ये पाच जण होते, अशी माहिती मिळते आहे.
अपघातात एअर अॅम्ब्युलन्सच्या पायलटचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना लष्कराच्या विमानातून तातडीने बँकॉकमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकमध्ये झालेल्या एअर अॅम्ब्युलन्सच्या अपघातात पायलट अरुणाक्ष नंदी यांचा मृत्यू झाला आहे. तर डॉक्टर शैलेंद्र आणि डॉक्टर कोमल यांना उपचारासाठी बँकॉकमधील हॉस्पिटलमध्ये आयसीयूत हलवण्यात आले आहे. तर इतर दोघांना किरकोळ जखम झाली आहे.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन सर्वोतपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
