Zero Hour Nashik Palika : नाशिकमध्ये पाण्याची टंचाई, नागरिकांचे हाल, महापालिकेचे महामुद्दे काय?
Zero Hour Nashik Palika : नाशिकमध्ये पाण्याची टंचाई, नागरिकांचे हाल, महापालिकेचे महामुद्दे काय?
विविध शहरांमधल्या महापालिकेच्या महामुद्दे मधील विशेष रिपोर्ट्स आणि त्यासाठी पहिल्यांदा जाऊया नाशिक शहरात मंडळी आपल्या महापालिका या नको त्या गोष्टींमध्ये एकमेकांचा कित्ता गिरवतात असं म्हणण्याची आता वेळ आली आहे. पिंपरी चंडपट शहरातली पाणी टंचाई त्यामुळे टँकरवर करावा लागणारा खर्च पिंपरीला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाणी असलं तरी घराघरांमधील नळ कसे कोरडे आहेत यावर आपण सविस्तर रिपोर्ट महापालिकेचे महामुद्दे. या सत्रातच पाहिलाय आणि पिंपरी चिंचवड मधल्या कच्चा दुव्यांची तंतोतंत पुनरावृत्ती ही नाशिक शहरात सुरू आहे. नवीन नाशिक भागात पाण्याचा प्रचंड त्रास आहे. तिथली नेमकी समस्या काय आहे ते पाहूया. खास रिपोर्ट. नाशिक शहराची गेल्या काही वर्षांपासून झपाड्याने वाढ होतीय. सातपूर आणि अंबड या नवीन नाशिक परिसरात मोठ्या संख्येने कामगारांची वस्ती आहे. मात्र इथल्या अनेक भागांमध्ये पाण्याची मोठी टंचाई आहे. गणेश चौक, मोरवाडी, उत्तमनगर, सिंहस्थनगर आणि पवन नगरच्या रहीवाशांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. शहराच्या मध्यवर्ती भागात राहत असूनही महिलांना हात पंपावर जाऊन पाणी उपसाव लागते. सध्या नाशिकच्या सिडको परिसरात असलेला गणेश चौक या परिसरामध्ये आहे. आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये पाण्याची समस्या ही नागरिकांना भेटसवते. या ठिकाणी कामगार वस्ती आहे. अतिशय दाट वस्तीचा हा संपूर्ण परिसर आहे. आपण जर बघितलं तर शहराच्या अत्यंत महत्त्वाच्या भाग असलेल्या नवीन नाशी परिसरामध्ये या ठिकाणी अक्षरश आता या महिलांना थेट हपशावर जाऊन पाणी भराव लागत. नेमकी काय या ठिकाणची अडचण आहे आणि पाण्याचा नेमका पुरवठा का होत नाही या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत काही स्थानिक महिला आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नेमक मावशी अडचण आहे? काय सांगाल का बरं पाणी येत नाही? आम्ही इथे तानाजी चौकामध्ये राहणारे सगळ्या महिला आहे किंवा परिवार आहे. आमच्या इथे वारंवार हा पाण्याचा प्रश्न असतो. आठ दिवस झाले की आठवड्यातन एकदा ते दोनदा पाणी अचानक येतच नाही. आणि हाफशाला सुद्धा किती पाणी राहणार आहे? आपल्या सोबत आणखी काही महिला आहेत काय नेमकी अडचण आहे महापालिकेकडून तुम्हाला सांगितलं जातं का पाणी येणार नाही किंवा काय ते आज काही सांगितलं नाही त्यान दरवेळेस सांगतात पण आज अचानक पाणी आलच नाही आम्ही काय कर? एक ते दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहतो. या सगळ्यामुळे अनेक रहिवासी इमारतींनी टँकर मागवण्यास सुरुवात केली आहे. नवीन नाशिक परिसरातल्या अनेक पाईपलाईन जुन्या झाल्याने जीर्ण झाल्या ज्यामुळे दूषित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होतो असं पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंते एजाज कासी हे मान्य करतात. बऱ्याच ठिकाणी सिडकोत वस्ती असल्याने छोटी गल्ली बोळ आहे. तिथेच लोकांचे अतिक्रमण. झाले आहे ड्रेनेज लाईन आणि पाण्याची लाईन लोकांची घरातून आहे काही काही ठिकाणी आणि ओट्यामध्ये आहे तर तिथे काम लोक कामही करू देत नाही, आपल त्यांच ओटही तोडू देत नाही किंवा मध्ये शिरू देत नाही. सामाजिक कार्यकर्ते डवोकेट अजिंक्य गीते यांनी तर पाणी पुरवठ्यात राजकारण शिरल्याचा आरोप केलाय. ही जी कुत्रीम पाणी टंचाई हे आमचा परत परत म्हणण की कोणीतरी या नाशिक शहराला पाण्याच्या नावाखाली वेटीस धरते आणि हे कोण धरते. नवीन नाशिक भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जातीय का? टँकर माफियांचा जम बसावा म्हणून हे सगळं सुरू आहे का? पाण्याची सोय केल्यावरच नव्या भागांना परवानगी दिली पाहिजे एवढी साधी गोष्ट महापालिकेला. कळू नये अतिक्रमण असलेल्या भागांमध्ये पाणी चोरी होत नाही हे मनपा ठामपणे सांगू शकत का? अनेक प्रकारचे कर भरूनही नागरिकांनी पाणी टंचाई का सहन करायची? नियोजनाचा अभाव हा आपल्या सर्वच महापालिकांच्या पाचवीला पुजलेला आहे. शहर अस्ताव्यस्त वाढत जातात. बिल्डरांना परवानग्या मिळत राहतात.
















