Tesla Baby : कार ऑटोपायलट मोडवर, फ्रंट सीटवरच बाळाचा जन्म, नक्की काय घडलं?
Tesla Baby : अमेरिकेत एका महिलेने कारच्या पुढच्या सीटवरच बाळाला जन्म दिला आहे. यावेळी कार ऑटोपायलट (Autopilot) मोडवर होती.
Tesla Baby : अमेरिकेत (America) टेस्ला इलेक्ट्रिक कार (Tesla Electric Car) च्या पुढच्या सीटवर एका महिलेने बाळाला जन्म दिला. त्यावेळी कार ऑटोपायलटवर (Autopilot) होती. हे दाम्पत्य घरापासून 20 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्याआधीच महिलेने कारमध्येच आपल्या मुलीला जन्म दिला. यावेळी कार ऑटोपायलट मोडमध्ये होती. सध्या हे बाळ जगभरात 'जगातील पहिली टेस्ला बेबी' (World First Tesla Baby) नावाने प्रसिद्ध झाले आहे.
अमेरिकेच्या फिलाडेल्फिया (Philadelphia) मध्ये राहणारे दाम्पत्य ल एका महिलेने तिच्या इलेक्ट्रिक कारच्या पुढील सीटवर बाळाला जन्म दिला विशेष म्हणजे यावेळी कार ऑटोपायलट मोडवर चालत होती. या महिलेचे नाव यिरन शेरी असे आहे. या बाळाचा जन्म सप्टेंबरमध्ये झाला असून सध्या त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. फिलाडेल्फियाची रहिवासी यिरन शेरी (33), तिचे पती,कीटिंग (34), आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा राफा यांच्यासोबत कारमध्ये होते जेव्हा यिरन यांनी प्रसूती वेदना होऊ लागल्या.
My wife courageously delivered our baby girl, Maeve, in the front seat of our @Tesla model 3 en route to the hospital - here’s the story @PhillyInquirer ! @elonmusk @Tesla thx for the autopilot 🤝💯 #tesbaby https://t.co/JPMfh7AyhN
— Keating Sherry (@KeatingSherry) December 16, 2021
मीडिया रिपोर्टनुसार, हे जोडपे हॉस्पिटलपर्यंत जाताना वाहतूक कोंडी झाली. यावेळी यिरन यांनी प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्यामुळे हॉस्पिटलपासून 20 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या यिरन यांनी कारच्या पुढच्या सीटवरच गोंडस मुलीला जन्म दिला. यावेळी यिरन याचे पति यांनी कार ऑटोपायलट मोडवर ठेवून गर्भवती पत्नी आणि नवजात बाळासह मुलाची काळजी घेतली. यानंतर पाओली हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी कारमध्येच बाळाची नाळ कापली. हॉस्पिटलच्या परिचारिकांनी नवजात बाळाला 'द टेस्ला बेबी' असे नाव दिले. त्यानंतर हे नाव जगभरात प्रसिद्ध झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Winter Assembly Session : उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन; सत्ताधारी आणि विरोधकांची खलबतं
- गेल्या 24 तासात देशभरात 5 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, तर 453 जणांचा मृत्यू
- Cold Weather : डिसेंबर अखेरीस महाराष्ट्र गारठला, कोकण, विदर्भासह मराठवाड्याला हुडहुडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha