(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cold Weather : डिसेंबर अखेरीस महाराष्ट्र गारठला, कोकण, विदर्भासह मराठवाड्याला हुडहुडी
Maharashtra Weather Today : देशभरात थंडीची लाट पसरली आहे. डिसेंबर महिना संपताना महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झालीय. परभणीत पारा 7.6 अंशांवर घसरलाय.
Weather Today : देशभरात थंडीची लाट पसरली आहे. डिसेंबर महिना संपताना महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झालीय. परभणीत पारा 7.6 अंशांवर घसरलाय. यंदाच्या मोसमातील हे नीच्चांकी तापमानाची नोंद झालीय. तर भंडारा जिल्ह्यातही पारा घसरलाय. जिल्ह्यात 9 अंश तापमानाची नोंद झालीय. त्याचबरोबर जिल्हात काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली.
राज्यामध्ये थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. यामुळे परभणी, भंडारा, वाशिम, हिंगोलामध्ये नागरिक शेकोट्या करून गुलाबी थंडीचा आस्वाद घेताान पाहायला मिळत आहेत. इतकच नाहीतर कोकणातही हुडहुडी भरणारी थंडी आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही पारा घसरला आहे. महाराष्ट्रासह राजधानी दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्येही तापमानात कमालीची घट झाली आहे. राजस्थानमध्ये काश्मीरप्रमाणे दवबिंदू गोठवणारी थंडी पडली आहे. मध्यप्रदेशातही तापमानाचा पारा घसरला आहे. काश्मीरपासून राजस्थानपर्यंत उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये तापमान उणे सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे.
दरम्यान हवामान खात्याने वर्तवल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. याआधीही हवामान खात्याने तापपमान घसरण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यासह देशभरात गारठा वाढल्याचं पाहायला मिळतंय.
उत्तर प्रदेशात तापमान घसरले आहे. राजस्थानमध्ये काश्मीरप्रमाणे दवबिंदू गोठवणारी थंडी आहे. मध्य प्रदेशातही थंडीने थरथर उडाला आहे. काश्मीरपासून राजस्थानपर्यंत उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये तापमान उणे सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : ख्रिसमस सेलिब्रेशन ठरू शकतं घातक, कुठे लॉकडाऊन तर कुठे कडक निर्बंध, भारतातही कठोर नियम लागू
- Bharat Biotech ने मागितली Nasal Vaccine च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी
- Ankita Lokhande चा पति Vicky Jain कोण आहे? जाणून घ्या मालमत्तेसह कार कलेक्शनची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha