Russia Ukraine War : बंदी बनवलेले युक्रेनचे सैनिक रशियाला रवाना, एक हजारहून अधिक सैनिकांचा समावेश
Ukrainian Soldiers : युक्रेनच्या बंदी बनवलेल्या सैनिकांच्या अदला-बदली करण्याच्या विचारात आहे मात्र रशिया युद्धात बंधक बनवलेल्या सैनिकांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
Ukrainian Soldiers Sent To Russia : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्ध सुरु होऊन 100 हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही युद्ध सुरुच आहे. युक्रेनमधील अनेक शहरं उदध्वस्त झाली आहेत. रशियन सैन्याच्या हल्ल्यात युक्रेनच्या अनेक निरपराध नागरिकांनी आणि सैनिकांची जीव गमावला आहे. या दरम्यान एक मोठी महिती समोर आली आहे. रशियाने युक्रेनच्या बंदी बनवलेल्या एक हजारहून अधिक सैनिकांनी तपासासाठी रशियाला रवाना केले आहेत. युद्धामध्ये रशियन सैन्यासमोर अनेक युक्रेनियन सैनिकांनी आत्मसमर्पण केलं.
तास वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, रशियन कायदा अंमलबजावणी सुत्रांच्या हवाल्याने माहिती देत सांगितलं आहे की, मारियुपोल शहारात आत्मसमर्पण करणाऱ्या एक हजारहून अधिक सैनिकांना तपासासाठी रशियाला पाठवण्यात आलं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की या सैनिकांना नायक मानतात, पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या सैनिकांना नाझी अपराधी म्हणत आहेत.
पकडलेल्या युक्रेनियन सैनिकांचे काय होईल?
युक्रेन सरकारकडून अझोव्हस्टल प्लांटमधील अंदाजे 2,000 सैनिकांना कैद्यांच्या अदलाबदलीसाठी सोपवण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु रशियन खासदारांनी काही युक्रेनियन सैनिकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. टास या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे की, अझोव्स्टल येथून 1000 हून अधिक लोकांना रशियात आणण्यात आलं. कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था त्यांच्याशी जवळून काम करत आहेत. या सैनिकांसोबत पुढे काय करण्यात येईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे 24 फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या युद्धात रशियन सैनिकांनी युक्रेनमधील अनेक शहरे आणि परिसर उद्ध्वस्त केले आहेत. युक्रेनमधून लाखो लोकांनी पलायन केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Sri Lanka Crisis : श्रीलंकेची भारताकडे मदतीची हाक, मागितली 55 मिलियन डॉलरची मदत
- Environmental Performance : पर्यावरण निर्देशांकात 180 देशांमध्ये भारत सर्वात खालच्या क्रमांकावर, इतर देशांची स्थिती जाणून घ्या
- World Ocean Day 2022 : जागतिक महासागर दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.